प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळा होत आहेत डिजीटल


मा. नामदार प्रा. राम शिंदे, सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांच्या विकास निधीतून सन 2025–26 या आर्थिक वर्षात कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना एकूण 95 इंटरॲक्टिव्ह पॅनेलचे वितरण करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक, डिजिटल व तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. इंटरॲक्टिव्ह पॅनेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑडिओ-व्हिज्युअल शिक्षण, प्रात्यक्षिके, शैक्षणिक व्हिडिओ तसेच डिजिटल अभ्यासक्रम अधिक प्रभावीपणे समजून घेता येणार आहे. यामुळे अध्यापन प्रक्रिया अधिक सुलभ, संवादात्मक व गुणवत्तापूर्ण होण्यास मदत मिळणार आहे.

शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर व्हावा, ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक दरी कमी व्हावी तसेच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमाबद्दल शिक्षक, पालक व शिक्षणप्रेमींनी समाधान व्यक्त केले असून कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या शैक्षणिक प्रगतीस निश्चितच चालना मिळणार आहे. यासाठी प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून आजतगायत कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना 225 इंटरॲक्टिव्ह पॅनेल देण्यात आले आहेत. उर्वरीत शाळांना देखील नजिकच्या इंटरॲक्टिव्ह पॅनेल उपलब्ध करून कर्जत तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषदेच्या शाळा डिजीटल करण्याचा मानस आहे.
मा. प्रा. राम शिंदे यांच्या या शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी मिळून त्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.




