google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

राजलक्ष्मी सोलर ग्रुप अँड कन्स्ट्रक्शनच्या वतीने राशीनमध्ये सौरऊर्जा प्रकल्पांना गती; कायमस्वरूपी शून्य वीजबिलाची संधी

Samrudhakarjat
5 4 8 7 8 9

राशीन (प्रतिनिधी – जावेद काझी) : वाढते वीजबिल आणि पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आता घरगुती, व्यावसायिक तसेच औद्योगिक स्तरावर सौरऊर्जा प्रकल्पांचा पर्याय अधिक प्रभावी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर राशीन व परिसरातील नागरिक, व्यापारी आणि उद्योजकांसाठी शासकीय नोंदणीकृत सोलर व्हेंडर ‘राजलक्ष्मी सोलर ग्रुप अँड कन्स्ट्रक्शन’ यांच्या वतीने सौरऊर्जा प्रकल्प उभारणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वाढत्या महागाईच्या काळात वीजबिलाचा भार हलका व्हावा, यासाठी भविष्यातील बचतीची सुरुवात आजपासूनच करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. शासकीय योजनेअंतर्गत १ किलोवॅट सोलर प्रकल्पासाठी ३० हजार रुपये, २ किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि ३ किलोवॅटसाठी ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान (सबसिडी) मिळण्याची तरतूद आहे. या अनुदानाच्या माध्यमातून वीजबिल शून्यावर आणण्यास मदत होऊ शकते.

येथे दर्जेदार सोलर पॅनेलसह तब्बल २५ वर्षांची वारंटी दिली जात असून, घरगुती प्रकल्पांसोबतच विशेषतः इंडस्ट्रीयल आणि कमर्शियल सोलर प्रकल्पांची कामेही हाती घेतली जाणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज चौक, राशीन (ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) येथे ‘राजलक्ष्मी सोलर ग्रुप अँड कन्स्ट्रक्शन’चे कार्यालय कार्यरत आहे. अधिक माहिती व सोलर प्रकल्पाच्या नोंदणीसाठी प्रोप्रायटर महेश राजेंद्र चुंबळकर (७७२००५२३१४), गणेश राजेंद्र चुंबळकर (७०५८३६६०२१) आणि राजेंद्र लक्ष्मण चुंबळकर (९८९०८०२२९८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker