pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
Trending

कर्जत नगरपंचायतीच्या विषेश समित्यांच्या सभापतींच्या निवडी जाहीर, पाणी पुरवठा सभापतीपदी भाऊसाहेब तोरडमल यांची निवड 

Samrudhakarjat
4 6 2 6 2 0

कर्जत (प्रतिनिधी) : – कर्जत नगरपंचायतीच्या विषेश समित्यांच्या सभापतींच्या निवडी करण्यात आल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी उषा राऊत, आरोग्य समितीच्या सभापतीपदी रोहीणी घुले यांची तर पाणी पुरवठा समितीच्या सभापतीपदी भाऊसाहेब तोरडमल यांच्या निवडी करण्यात आल्या, निवडीनंतर सर्व नुतन सभापतींचा सन्मान करण्यात आला. कर्जत नगरपंचायतीचे विषेश समित्यांचे नुतन सभापती निवडीसाठी गटनेते संतोष म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत नगरपंचायतीच्या नगरसेवक व नगरसेविका यांची काल नगरपंचायती च्या सभागृहात बैठक झाली. यामध्ये विषेश समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात आली. स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्षा उषा अक्षय राऊत यांची निवड करण्यात आली तर आरोग्य समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्षा रोहिणी सचिन घुले यांची निवड करण्यात आली, पाणी पुरवठा समितीच्या सभापतीपदी भाऊसाहेब तोरडमल यांची निवड करण्यात आली,

महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सुवर्णा सुपेकर व उपसभापती पदी लंकाताई खरात यांची निवड करण्यात आली तर बांधकाम सभापतीपदी ताराबाई कुलथे यांची निवड करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी अजय साळवे, प्रथम नगराध्यक्ष,नगरसेवक नामदेव राऊत,सतिष पाटील,अमृत काळदाते, भास्कर भैलूमे, अभय बोरा, रज्जाक झारेकरी, नगरसेविका प्रतिभा भैलूमे, ज्योती शेळके, छाया शेलार उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही नगरसेविका अनुपस्थित होत्या. या बैठकीत आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर कर्जत शहरात निर्मल दिंडी अभीयान राबविले जाणार आहे याबाबत चर्चा करण्यात आली, यामध्ये टाॅयलेट, पाणी पुरवठा, स्वच्छता, निवास व्यवस्था, सुरळीत विज पुरवठा,

निवास व्यवस्था,सुरळीत विज पुरवठा यावर चर्चा करण्यात आली आमदार रोहित पवार यांनी 25 लाख रुपयांचा निधी कर्जत नगरपंचायतीसाठी मंजूर केला आहे. यामधून कापरेवाडी वेस येथील पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच दुरुस्ती व देखभालीसाठी हायड्रोलिक गाडी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. गटनेत संतोष मेहत्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नामदेव राऊत व युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घुले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील शेलार, मुख्याधिकाऱ्यांसह उपस्थित सर्वांनी नुतन पदाधिकाऱ्याना सन्मानित केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker