मुख्यमंत्री ग्रामसडक योजना 2024-25 अंतर्गत “रामा-४०५ (चौंडी) ते निमगाव डाकु” रस्त्याच्या सुधारित कामास प्रशासकीय मान्यता…

कर्जत (प्रतिनिधी) :- या रस्त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे…पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सूतगिरणीमुळे रोजगारप्राप्ती, ग्रामीण अर्थकारणाला नवी गती, महिला स्वावलंबन, शाळा, महाविद्यालय उभारणीद्वारे शिक्षण सुविधा आणि या रस्त्यामुळे दळणवळण सुविधा= त्यायोगे विकासाला गती ही सर्व उद्दिष्टये साधली जाणार आहेत…आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी सांगितल्याप्रमाणे
सबका साथ सबका विकास सबका प्रयास
सबका सहभाग…हा विकासाचा मूलमंत्र आपण यायोगे यशस्वीपणे राबवित आहोत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त 06 मे 2025 रोजी त्यांच्या जन्मगाव चौंडी येथे मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यायोगे या रस्ता कामाच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला आहे.
1. कामाचे महत्त्व:
सदर रस्ता चौंडी ते निमगाव डाकु (ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) या दरम्यान असून याअंतर्गत सुमारे 2.700 कि.मी. लांबीच्या रस्त्याचे सुधारित रूपाने बांधकाम करण्यात येणार आहे.
चौंडी येथे प्रस्तावित सूतगिरणी व भविष्यातील औद्योगिक कारणासाठी होणारी वाहतूक लक्षात घेऊन पूर्वी मंजूर 3.75 मीटर रस्त्याऐवजी 5.50 मीटर डांबरी मोटर योग्य रस्त्याचे काम आता करण्यात येईल…
सदर मार्गाने नागरिकांचे सुमारे 10 कि.मी.चे अंतर वाचणार असून, वेळ, इंधन व वाहतूक खर्चात लक्षणीय बचत होणार आहे.
2. रस्त्याचे काम:
योजना: मुख्यमंत्री ग्रामसडक योजना 2024-25, टप्पा 2
अंमलबजावणी यंत्रणा: महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, अहिल्यानगर
पॅकेज क्र.: रामा-४०५ (चौंडी) ते निमगाव डाकु (किमी 0/00 ते 2/700)
कामाचा प्रकार: सुधारणा व मजबुतीकरण (दर्जोन्नतीकरण)
प्रस्तावित लांबी: 2.700 किमी रस्त्याची एकूण रुंदी: साईड पट्ट्यांसह 7.50 मीटर डांबरीकरण रुंदी: 5.50 मीटर
3. प्रशासकीय व वित्तीय माहिती: मूळ मंजूर रक्कम: रु. 300.89 लक्ष (पूर्वीचा प्रस्ताव रद्द) नवीन प्रशासकीय मंजूरी: रु. 394.04 लक्ष (दि. 16.04.2025) नवीन निविदा रक्कम: रु. 315.76 लक्ष (प्रक्रिया प्रगतीत) निविदा उघडण्याची तारीख: लगेच उद्या दिनांक 07.05.2025 पाच वर्ष देखभाल व दुरुस्ती: रु. 13.74 लक्ष
4. तांत्रिक तरतुदी: रस्ता डांबरीकरण रुंदी | 5.50 मीटर | | साईडपट्ट्यासह एकूण रुंदी | 7.50 मीटर | | भराव रुंदीकरण | 2.70 मीटर | | जीएसबी खडीकरण | 150 मिमी, 2.70 मीटर रुंदी | | जी-2 खडीकरण | 75 मिमी (2 थर), 2.70 मीटर | | डांबरीकरण | MPM+कारपेट+सिलकोट, 2.70 मीटर | | नळकांडी पुल प्रस्तावित 5. नागरिकांना होणारा थेट फायदा:
पूर्वी जुना बैलगाडी रस्ता वापरावा लागत होता, आता चापडगाव मार्गे जाण्याची गरज नाही.
रस्ता झाल्यास चौंडी ते निमगाव डाकु प्रवासात 10 किमी अंतराची बचत.
सूतगिरणी प्रकल्पामुळे भविष्यातील वाहतुकीसाठी रस्ता महत्त्वाचा ठरणार.
परिसरातील गावांना जलद व सुरक्षित वाहतूक मार्ग मिळणार.
ग्रामीण भागाचा औद्योगिक व आर्थिक विकास गतीने होणार.
6. सभापती प्रा राम शिंदे साहेब यांचा पाठपुरावा…
मा.प्रा. राम शिंदे, मा. सभापती महाराष्ट्र विधान परिषद यांनी सदर रस्त्याच्या सुधारित कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला असून शासनाने या कामास प्रशासकीय मान्यता दिली आहे.
सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लवकरच काम सुरु करण्यात येणार आहे.
मला खात्री आहे या जन्म त्रिशताब्दी निमित्त श्री क्षेत्र चौंडी येथे देशभरातून येणाऱ्यांची संख्या मोठी असणार आहे…या मार्गावरून येणाऱ्या सर्वांनाच जलद वाहतुकीची सुविधा या रस्त्यामुळे उपलब्ध होईल.