pub-1628281367759110
Advertisement
ब्रेकिंग

Samrudhakarjat
4 6 0 6 9 4

कर्जत जि.अहिल्यानगर येथील सर्व सामाजिक संघटनेच्या पर्यावरण संवर्धनाच्या कामांची पाहणी कुंडल जि. सांगली येथील वन प्रबोधिनीतील वनरक्षक प्रशिक्षणार्थींनी दिनांक ६/२/२०२६ रोजी केली. यामध्ये ४० प्रशिक्षणार्थी महिला व पुरुष वनरक्षकांचा समावेश होता.

कर्जत शहर व परिसरात सर्व सामाजिक संघटना कर्जत या नावाने २ ऑक्टोबर २०२० पासून सलग १९५४ दिवस म्हणजे पाच वर्षापेक्षा जास्त दिवस दररोज श्रमदान करून लोक सहभागातून केलेल्या विविध पर्यावरण संवर्धन कामांची विशेषता वृक्षारोपणाची व चळवळीची तसेच कार्यप्रणालीची माहिती घेतली. वनरक्षक प्रशिक्षणार्थींची प्रशिक्षणाचा भाग म्हणून राज्यामध्ये अभ्यास दौऱ्याचे आयोजन करून विविध ठिकाणी भेटी देऊन वेगवेगळ्या विभागातील वृक्षांचे प्रकार, वनांचे प्रकार, वनक्षेत्र ,अभयारण्य व नाविन्यपूर्ण तसेच पथदर्शक प्रकल्पांचा अभ्यास व माहिती दौऱ्या दरम्यान घेतली जाते.

याचाच भाग म्हणून या प्रशिक्षणार्थींनी कर्जत येथे भेट देऊन सर्व सामाजिक संघटनेच्या कार्याची माहिती जाणून घेतली तसेच श्रमदानातून केलेल्या विविध कामापैकी जैवविविधता उद्यान भांडेवाडी येथील सलग श्रमदानाच्या पंचवर्षपूर्तीनिमित्त ४ ऑक्टोबर २०२५ रोजी एकाच वेळी लागवड केलेल्या५५५५ रोपांच्या घनवन प्रकल्पाची तसेच पार्कच्या भोवती श्रमदानातून कुंपणासाठी लागवड केलेल्या फुलझाडे व बांबू रोपांची पाहणी केली. त्याचबरोबर रस्ता दुतर्फा लागवड केलेल्या राशीन रोड, नगर रोड ,वालवड रोड येथे लावलेल्या व फुलांनी बहरलेल्या वृक्षारोपणाची पाहणी केली. प्रभात नगर मधील उद्यानविकास आणि चिंचेचा मळा येथील घनवन प्रकल्पाची (मीयावाकी )पाहणी करून कमी कालावधीत अतिशय उत्कृष्टरित्या वाढलेल्या वृक्षांना पाहून आश्चर्य व्यक्त केले. सामाजिक संघटनेच्या या नावीन्यपूर्ण कामाची मुक्तकंठाने प्रशंसा व अभ्यासपूर्ण नोंदी सर्वच प्रशिक्षणार्थीनी यावेळी घेतल्या. याप्रसंगी सर्व सामाजिक संघटनेचे शिलेदार माहिती देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर अभ्यास दौरा कुंडल वन प्रबोधिनीचे प्रशिक्षण निदेशक श्री. ए.एम. सोनवणे यांनी आयोजित केला होता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker