कर्जत-अळसुंदेत ‘त्रिमूर्ती मंगल कार्यालय’चा शनिवारी भव्य शुभारंभ; ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाची मेजवानी!
इंदोरीकर महाराजांच्या सुस्राव्य कीर्तनासह महाप्रसादाचे आयोजन; रविंद्र कोठारी यांचे नागरिकांना सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन


कर्जत | प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील अळसुंदे येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ‘त्रिमूर्ती मंगल कार्यालय’ या वास्तूचा भव्य शुभारंभ शनिवार, दि. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या शुभारंभ सोहळ्यानिमित्त समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या सुस्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन होणार आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणात पार पडणाऱ्या या सोहळ्याला परिसरातील भाविक, नागरिक आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या मंगलमय सोहळ्याचे निमंत्रक श्री. रविंद्र लिलाचंद कोठारी असून, कर्जत-अळसुंदे रोड, अळसुंदे, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.

महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी तसेच वास्तूच्या शुभारंभ सोहळ्याची शोभा वाढविण्यासाठी सर्वांनी सहकुटुंब उपस्थित राहावे, अशी नम्र विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.



