google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

ऊस वाहतुकीत अपघात टाळण्यासाठी कर्जत पोलिसांचा पुढाकार; चालकांना सुरक्षेचे धडे!

Samrudhakarjat
5 3 7 8 2 3

कर्जत (प्रतिनिधी) : – कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत ऊस वाहतुकीचे प्रमाण वाढत असल्याने संभाव्य रस्ते अपघात रोखण्यासाठी कर्जत पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर बारडगाव सुद्रीक (ता. कर्जत) येथील अंबालिका साखर कारखान्यात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांची विशेष बैठक घेण्यात आली. पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी वाहनचालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत कडक सूचना देत निष्काळजीपणा केल्यास अपघाताला निमंत्रण मिळू शकते, याची जाणीव करून दिली.

या बैठकीस अंबालिका कारखान्याचे एमडी चौगले, मुख्य संचालन अधिकारी जंगल वाघ, जनरल मॅनेजर भोसले, सिव्हिल इंजिनिअर खताळ, मुख्य शेतकी अधिकारी चाकणे, ऊस विकास अधिकारी शिंदे, पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक मुळीक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, अमोल रायकर, किरण बोराडे तसेच ट्रॅफिक अंमलदार सुरेश लोंढे उपस्थित होते.

यावेळी पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी वाहनचालकांना आठ महत्त्वाच्या सूचना दिल्या. कोणत्याही परिस्थितीत दारू पिऊन वाहन चालवू नये, ट्रॅक्टरवर मोठ्या आवाजात टेप लावू नये, प्रत्येक वाहनाचा विमा उतरवावा, वाहनाच्या मागील बाजूस रिफ्लेक्टर लावावेत, निष्काळजीपणे वाहन चालवू नये, वाहन रस्त्यात बंद पडल्यास मागून येणाऱ्या वाहनांना त्याचा अंदाज येण्यासाठी योग्य दर्शक चिन्हे लावावीत, ट्रॅक्टरच्या समोरील बाजूस सजावट करून समोरून येणाऱ्या वाहनांच्या दृश्यतेला अडथळा निर्माण करू नये तसेच प्रत्येक चालकाने वाहन चालविताना वाहन परवाना सोबत बाळगावा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

दरम्यान, कारखान्याचे एमडी चौगले साहेब यांनीही ऊस वाहतूकदारांना कडक सूचना दिल्या. ज्या वाहनांना मागील बाजूस रिफ्लेक्टर लावलेले नसतील, अशा वाहनांना कारखान्याच्या गेटच्या आत प्रवेश दिला जाणार नाही, असा ठाम निर्णय त्यांनी जाहीर केला. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनावर रिफ्लेक्टर असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ऊस वाहतुकीच्या हंगामात रस्त्यांवर ट्रॅक्टर व इतर अवजड वाहनांची वर्दळ वाढते. अशा वेळी वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे, स्वतःसह इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. अपघातमुक्त ऊस वाहतुकीसाठी कर्जत पोलीस आणि अंबालिका कारखाना प्रशासनाने घेतलेला हा पुढाकार महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker