google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

दादा पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केला पर्यावरणयुक्त दिवाळीचा जागर

Samrudhakarjat
5 3 5 8 9 5

दादा पाटील महाविद्यालयाच्या पर्यावरण जनजागृती, सांस्कृतिक विभाग तसेच वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे, झेप फाऊंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दीपावलीच्या पार्श्वभूमीवर कर्जत शहर परिसर, एस.टी बसस्थानक, बाजारतळ, कर्जत शहरातील विद्यालये व मुख्य रस्त्यांवर पथनाट्याच्या माध्यमातून पर्यावरणयुक्त दिवाळीचा जागर पथनाट्यातून केला गेला. ‘फटाके मुक्त दिवाळी अभियान’, ‘झाडे लावा झाडे जगवा’, ‘प्रदूषण टाळा व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा’ यासारखी घोषवाक्य व दीपावलीच्या काळात विषारी फटाके वाजवल्यामुळे होणारे वायूप्रदूषण, श्वसनाचे गंभीर आजार, दमा, अंधत्व, बहिरेपणा उद्भवण्याचा धोका असतो. शिवाय वृद्धांना फटाकेंचा होणारा त्रास तसेच कर्जत तालुक्यात मुलगी वाचवा अशा विविध नाट्य प्रसंगांची एकत्रित गुंफण करून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘चला साजरी करूया प्रदूषण मुक्त दिवाळी’ या पथनाट्याच्या माध्यमातून पर्यावरण युक्त दिवाळीबाबत प्रबोधन केले.

प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या संकल्पनेतून पर्यावरणाच्या संदर्भातील जनजागृतीचा भाग म्हणून हे पथनाट्य सादर करण्यात आले. सांस्कृतिक विभागाचे डॉ प्रमोद परदेशी यांच्या सहकार्यातून व सांस्कृतिक विभागाचे प्रा. स्वप्नील म्हस्के व पर्यावरण जनजागृती विभागाचे प्रा. वैभव वरडुळे यांच्या मार्गदर्शनातून हे पथनाट्य सादर करण्यात आले. गौरव धांडे, राहुल भोसले, चैतन्य शेटे, रुपेश गायकवाड, अनुष्का कदम, साक्षी खाटमोडे, साक्षी काळे, या विद्यार्थ्यांनी हे प्रबोधनपर पथनाट्य सादर केले. प्रकाश शिंदे याचे याकरिता उत्कृष्ट संहिता सहकार्य लाभले. प्रा. अनुपम शिवरकर, प्रा. उमेश शिंदे व सांस्कृतिक विभागातील कुणाल नेटके, दिग्विजय रानमाळ या विद्यार्थ्यांनी पथनाट्यासाठी सहकार्य केले.

विद्यार्थ्यांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाबद्दल एसटी स्टँडवरील प्रवासी, बाजारतळावरील विक्रेते, दुकानदार तसेच कर्जत शहर व परिसरातील नागरिक यांनी या पथनाट्याचे विशेष कौतुक केले. प्राचार्य डॉ संजय नगरकर यांच्या संकल्पनेतून पर्यावरणाचे संवर्धन व्हावे या उद्देशाने अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम वर्षभर राबवले जातात. 

पथनाट्यपर जनजागृती बद्दल प्राचार्य डॉ. संजय नगरकर, झेप फाउंडेशनच्या प्रमुख डॉ. रेखा चौधरी, सदस्या वैशाली चव्हाण, महाविद्यालय विकास समिती, माजी विद्यार्थी संघटना यांनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker