google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

दुष्काळात माणसी ४० लिटर पाणी द्या! शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन तोरडमल यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

Samrudhakarjat
5 3 1 3 4 6

कर्जत (प्रतिनिधी ) :- कर्जत तालुक्यात दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण व नागरी भागातील नागरिकांना पाणीटंचाईच्या काळात प्रतिमाणसी सरसकट ४० लिटर पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे कर्जत तालुकाप्रमुख नितीन ईश्वर तोरडमल यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर केले आहे.

सध्या शासनाच्या निकषांनुसार पाणीटंचाईच्या काळात ग्रामीण भागासाठी प्रतिमाणसी २० लिटर, तर नागरी भागासाठी ३० लिटर पाणीपुरवठ्याची तरतूद आहे. मात्र, वाढती पाणीटंचाई आणि नागरिकांची गरज लक्षात घेता हे निकष अपुरे ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शासन निर्णयात बदल करून ग्रामीण आणि नागरी भागासाठी प्रतिमाणसी सरसकट ४० लिटर पाणी मंजूर करावे, अशी मागणी तोरडमल यांनी केली आहे.

दुष्काळाच्या काळात केवळ नागरिकांच्याच नव्हे, तर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनतो. जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याबाबत स्पष्ट शासन निर्णय नसल्यामुळे सरकारी यंत्रणांकडून आवश्यक सुविधा उपलब्ध होत नसल्याची बाब निवेदनातून मांडण्यात आली आहे. त्यामुळे जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याकरिता शासनाने तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना पुरेसे पिण्याचे पाणी मिळणे आवश्यक असून, सध्याच्या पाणीवाटपाच्या निकषांमध्ये बदल करण्याची गरज असल्याचे तोरडमल यांनी अधोरेखित केले आहे. शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून नागरिकांसह पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

या निवेदनाच्या प्रती विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

दुष्काळी परिस्थितीत नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन ग्रामीण व नागरी भागासाठी प्रतिमाणसी सरसकट ४० लिटर पाण्याचा निकष लागू करावा. तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठीही शासनाने स्वतंत्र व्यवस्था व आवश्यक निर्णय करावेत. – नितीन ईश्वर तोरडमल तालुकाप्रमुख, शिवसेना कर्जत
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker