ई-पेपरदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र
Trending
माझा नावाचे कोल्ड्रिंक्स पिल्याने आई,वडील व मुलांना विष बाधा

Samrudhakarjat
4
0
1
2
3
5
कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील अळसुंदे देमनवाडी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. थंडपेय माझा तून विष बाधा झाल्याने चार जण बेशुद्ध पडले आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी की, एका व्यक्तीने अळसुंदे गावातून माझा हे थंडपेय विकत घेवून एकञित काम करणाऱ्या लोकांना उन्हाचे दिवस असल्याने त्यांना माझा पेय पिण्यासाठी दिले असता चार जणांना विष बाधा झाल्याने ते बेशुद्ध पडले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या वर लगेच उपचार सुरू केल्याने प्रकृती स्थिर आहे.
देमनवाडी येथील शिवम भाऊसाहेब देवकाते वय पाच वर्ष माही भाऊसाहेब देवकाते वय अठ्ठावीस, प्रमोद दादा पालवे वय पंचवीस बाबाजी भिकाजी गायकवाड या भांडेवाडी वय अठ्ठावीस यांना केशर हास्पिटल येथे उपचार डॉ सुवेंन्द्र जवणे यांनी तातडीने सुरू केले.
विष बाधा की विष दिले थंडपेय माझा मधून विष बाधा झाली की, विष दिले यांची कसून चौकशी करण्याची गरज आहे.