pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

जिद्दीला यशाची पावती; भाग्यश्री गोरे ‘क्लास टू’ अधिकारी, कर्जतचा अभिमान

Samrudhakarjat
4 6 1 4 6 5

कर्जत : जिद्द, चिकाटी आणि अभ्यासाच्या बळावर तालुका कृषी अधिकारी (क्लास टू) पदावर निवड झालेल्या कुमारी भाग्यश्री जयवंत गोरे हिचा कर्जत शहरात सत्कार करण्यात आला. श्री मुंजोबा महाराज बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात यशस्वी लेकीसोबत तिच्या आई-वडिलांचाही सन्मान करून संस्कारांचे मोल अधोरेखित करण्यात आले.

नगरसेविका सुवर्णाताई रवींद्र सुपेकर यांच्या हस्ते हा गौरव सोहळा पार पडला. यावेळी भाग्यश्रीचे वडील जयवंत गोरे व आई यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मुलीच्या यशामागे असलेले त्यांचे कष्ट, त्याग आणि पाठबळ यावेळी उपस्थितांनी भरभरून गौरवले.

कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र सुपेकर यांच्यासह राजू धोत्रे, शशिकांत शेळके, गणेश मराठे,

विकी धोत्रे, भीमा थोरात, ओंकार थोरात, कुणाल माने, सागर थोरात, सुरज शेळके, सुनील भोज, सुरेश माने, अभिषेक थोरात, शुभम थोरात, हनुमंत थोरात, शारक सय्यद, नंदकुमार थोरात, आनंद बारटक्के, अनिल धोत्रे, अमरसिंह धोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच प्रभाग क्रमांक १३ मधील माता-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन मामा देशमुख यांनी केले, तर आभार राजू धोत्रे यांनी मानले.

सामान्य कुटुंबातून पुढे येत शासकीय सेवेत उच्च पद मिळवणाऱ्या भाग्यश्री गोरे आज कर्जतच्या तरुणाईसाठी प्रेरणास्थान ठरत असून, तिच्या यशामुळे परिसरात अभिमानाची लाट पसरली आहे. समाजाने अशाच गुणवंतांना साथ दिली, तर उद्याचा कर्जत अधिक उज्वल होईल, असा विश्वास यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र सुपेकर यांच्याकडून व्यक्त करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker