google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

राशीन येथील सुरगोणीवार हल्ल्याचे आरोपी अद्याप मोकाटच; पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह

Samrudhakarjat
5 4 7 4 8 6

राशीन (प्रतिनिधी – जावेद काझी):

राशीन येथील हॉटेल व्यावसायिक श्रीनिवास रंगय्या सुरगोणीवार यांच्यावर आठ जणांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेला एक महिना उलटून गेला आहे. मात्र, या गुन्ह्यातील आरोपींना अद्याप अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. धक्कादायक म्हणजे, हे आरोपी राशीन शहरात खुलेआम वावरत असल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर नागरिकांकडून तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

काय आहे नेमकी घटना?

गेल्या ४ ऑक्टोबर रोजी श्रीनिवास सुरगोणीवार यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांच्या डाव्या बाजूची बरगडी आणि नाकाचे हाड मोडले होते. हल्ल्यानंतर ते बेशुद्ध पडल्याने त्यांच्या मित्रांनी त्यांना तात्काळ बारामती येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे वेळेत उपचार सुरू झाल्यामुळे त्यांचे प्राण वाचले.

आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

सुरगोणीवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाळू कांबळे, योगेश बाळू कांबळे, मनोज बाळू कांबळे, रवी काळे, सोनू काळे देशमुख (सर्व रा. करपडी, ता. कर्जत) आणि इतर तीन अनोळखी अशा एकूण आठ जणांविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुटुंबियांची न्यायाची प्रतीक्षा आणि भीतीचे वातावरण

या गंभीर गुन्ह्यातील एकाही आरोपीला अद्याप अटक झालेली नाही, तर यातील दोन आरोपींना तात्पुरता जामीन मिळाला आहे. सुरगोणीवार कुटुंबाचे घर गावाच्या काहीशा बाहेरच्या बाजूला (आऊटसाईडला) असल्याने आरोपींकडून त्यांच्या जीवितास अद्यापही धोका असल्याची भीती कुटुंबियांकडून व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी आणि आम्हाला न्याय द्यावा, अशी कळकळीची विनंती सुरगोणीवार कुटुंबाने केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker