google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

कर्जत तालुका सकल मराठा समाजाच्या प्रमुख समन्वयकपदी शिवश्री निलेश (बंटी) यादव यांची सर्वानुमते निवड!

Samrudhakarjat
5 4 5 3 8 3

कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुका सकल मराठा समाजाच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळकटी देण्यासाठी आयोजित बैठकीत शिवश्री निलेश (बंटी) यादव यांची तालुका प्रमुख समन्वयकपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा आणि गती मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मराठा सेवकांनी व्यक्त केला.

या बैठकीला विजय (काका) तोरडमल, रावसाहेब धांडे, सुनील पवार, राहुल नवले, मनोज गायकवाड, श्रीहरी जगताप, विलास निकत, गणेश तोरडमल, राहुल गांगर्डे, प्रसाद कानगुडे, स्वप्नील तोरडमल यांच्यासह तालुक्यातील अनेक मराठा सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडीनंतर उपस्थितांच्या वतीने नूतन प्रमुख समन्वयक शिवश्री निलेश (बंटी) यादव यांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मागील समन्वयक शिवश्री रावसाहेब धांडे यांनी आपल्या कार्यकाळात अत्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावत समाजासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्याचा आम्हाला निश्चितच फायदा होईल. यापुढील काळातही त्यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य आम्हाला लाभेल, तसेच समाजाच्या प्रत्येक कार्यात ते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील…

यावेळी बोलताना निलेश यादव म्हणाले की, सकल मराठा समाजाच्या एकजुटीसाठी आणि समाजाच्या सर्वांगीण हितासाठी आपण सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहोत. आगामी काळात समाजाच्या विविध प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केले जातील. समाजाच्या न्याय्य मागण्या, विविध आंदोलने आणि संघटनात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन समाजाचा बुलंद आवाज बनण्याचा प्रयत्न राहील.

तसेच आगामी शिवजयंती उत्सव सर्व समाजबांधवांना विश्वासात घेऊन, एकजुटीने आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. समाजातील तरुणांना संघटित करणे, सामाजिक उपक्रमांना चालना देणे, समाजबांधवांमध्ये समन्वय वाढवणे आणि सर्वांना सोबत घेऊन संघटन मजबूत करणे यावर विशेष भर देणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

नूतन प्रमुख समन्वयकपदी झालेली ही निवड म्हणजे केवळ पदाची जबाबदारी नसून समाजाच्या अपेक्षा आणि विश्वास जपण्याची संधी आहे. सर्व समाजबांधवांना सोबत घेऊन संघटनात्मक कार्य अधिक व्यापक करण्याचे आव्हान आता निलेश (बंटी) यादव यांच्यासमोर असणार आहे. त्यांच्या निवडीचे कर्जत तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने स्वागत होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker