बाळासाहेब ठाकरे यांना राशीनमध्ये अभिवादन
पुण्यतिथीनिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा उपक्रम


राशीन, प्रतिनिधी जावेद काझी.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चौदाव्या पुण्यतिथीनिमित्त राशीन येथे मंगळवारी (ता. १७) सायंकाळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या विचारांचे स्मरण करत त्यांच्या संघर्षमय जीवनकार्याला उजाळा दिला. “मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी, हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी बाळासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या आक्रमक नेतृत्वाने व निर्भीड विचारांनी राज्याच्या राजकारणावर स्वतंत्र ठसा उमटवला असून, त्यांच्या विचारांचा हा वारसा यापुढेही सक्षमपणे नेण्यात येईल,” असा निर्धार यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केला.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख जितेंद्र शेटे, ज्येष्ठ शिवसैनिक सुनील दडगळ, रमेश परदेशी, अमोल दळवी, विकी साळवे, साहिल शेख, दादा राऊत, ज्येष्ठ पत्रकार महादेव सायकर-काळे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



