google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

कर्जत तालुक्यात शेतात गांजाची शेती उघड! पोलिसांचा छापा; ६३ किलो गांजा जप्त, ३१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

मिरजगाव पोलिसांची धडक कारवाई; अमली पदार्थांच्या लागवडीचे रॅकेट उघडकीस, एकाला अटक

Samrudhakarjat
5 3 8 2 0 6

कर्जत : कर्जत तालुक्यातील गुरवपिंप्री येथे शेतात गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिरजगाव पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत तब्बल ६३ किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून, या कारवाईत ३१ लाख ८२ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून, मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात अमली पदार्थांची लागवड व विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार गुरवपिंप्री (ता. कर्जत) येथील शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी कारवाईचे नियोजन केले.

पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विजय झंझाड यांच्या नेतृत्वाखाली मिरजगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक किरण जगदाळे, कर्जत व मिरजगाव पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि अंमलदार यांच्या पथकाने संयुक्तपणे संबंधित शेतावर छापा टाकला.

या छाप्यात शेतातील गांजाची झाडे व तब्बल ६३ किलो वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत एकूण ३१ लाख ८२ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी गावडे (रा. गावडेवाडी, ता. कर्जत) याला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या प्रकरणी मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गांजाची लागवड, त्यामागील उद्देश आणि या प्रकरणातील इतर संभाव्य सहभागाचा पोलीस तपास करीत आहेत.

अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, गांजाची लागवड आणि विक्री करणाऱ्यांविरोधात यापुढेही धडक कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker