google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

कर्जत नगरपंचायतीत बोनसचा पेच; कर्मचाऱ्यांच्या दिवाळीवर प्रश्नचिन्ह!

बोनस व सानुग्रह अनुदान तातडीने द्या; अन्यथा ‘फुसके फटाके फोडो’ आंदोलनाचा सभापती भास्कर भैलुमे यांचा इशारा

Samrudhakarjat
5 3 6 2 2 5

कर्जत | प्रतिनिधी :- दिवाळीचा सण उंबरठ्यावर, मात्र नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या बोनसचा प्रश्न अद्याप ऐरणीवर! शहराची स्वच्छता राखणाऱ्या, नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करणाऱ्या आणि अत्यावश्यक सेवा अखंड सुरू ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस व सानुग्रह अनुदान तातडीने वितरित करावे, अशी जोरदार मागणी नगरसेवक तथा बांधकाम समिती सभापती भास्कर भैलुमे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी कर्जत नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधले असून, मागण्यांची दखल न घेतल्यास ‘फुसके फटाके फोडो’ आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

कर्जत शहरातील स्वच्छता व्यवस्था सुरळीत ठेवणे, नागरिकांना पाणीपुरवठा करणे, विद्युत व्यवस्थेची देखभाल करणे आणि नगरपंचायतीची दैनंदिन प्रशासकीय कामे पार पाडणे, अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या कर्मचारी सातत्याने पार पाडत आहेत. नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात या कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

मात्र, दिवाळीसारखा महत्त्वाचा सण जवळ आलेला असताना पात्र कर्मचाऱ्यांना बोनस आणि सानुग्रह अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचा मुद्दा सभापती भास्कर भैलुमे यांनी उपस्थित केला आहे. शहरासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक गरजा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सणातील आनंद यांचाही प्रशासनाने विचार करावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

स्वच्छता, पाणीपुरवठा, विद्युत आणि आस्थापना विभागातील पात्र कर्मचाऱ्यांना नियमानुसार देय असलेला दिवाळी बोनस व सानुग्रह अनुदान तातडीने वितरित करावे. तसेच पोशाख आणि इतर प्रलंबित लाभ देय असल्यास त्याबाबतही आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे केवळ कागदोपत्री आश्वासन म्हणून न पाहता प्रत्यक्ष निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. दिवाळीच्या काळात कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा आणि त्यांना आपल्या कुटुंबासोबत सण साजरा करता यावा, यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, असे भैलुमे यांनी स्पष्ट केले.

‘फुसके फटाके फोडो’ आंदोलनाचा इशारा

कर्मचाऱ्यांच्या बोनस आणि सानुग्रह अनुदानाच्या मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास कर्जत नगरपंचायत कार्यालय परिसरात ‘फुसके फटाके फोडो’ आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा सभापती भास्कर भैलुमे यांनी दिला आहे.

दिवाळीच्या काळात सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना शहराची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या आर्थिक लाभांसाठी प्रतीक्षा करावी लागणे योग्य नाही. पात्र कर्मचाऱ्यांना नियमानुसार देय असलेले लाभ वेळेत मिळावेत आणि त्यांच्या कुटुंबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, हीच या मागणीमागील भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

आता कर्जत नगरपंचायत प्रशासन या मागणीवर कोणता निर्णय घेते आणि पात्र कर्मचाऱ्यांना बोनस व सानुग्रह अनुदानाबाबत कधी दिलासा मिळतो, याकडे कर्मचारी लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker