google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका! कुंभेफळमध्ये दोन एकर ऊस जळून खाक

अडीच ते तीन लाखांचे नुकसान; कांड्यावर आलेला ऊस आणि ठिबक सिंचन संचही आगीच्या भक्ष्यस्थानी!

Samrudhakarjat
5 3 1 0 7 4

कर्जत (प्रतिनिधी) :- : महावितरणच्या गलथान कारभारामुळे कुंभेफळ (ता. कर्जत) येथील शेतकरी कौस्तुभ धनंजय पाटील यांच्या दोन एकर ऊस पिकाला आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. या आगीत साधारण अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, काढणीच्या उंबरठ्यावर असलेले ऊस पीक आणि ठिबक सिंचन संच जळून खाक झाल्याने शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

शेतकऱ्यांनी मेहनतीने जोपासलेले ऊस पीक बारा ते पंधरा कांड्यांवर आले असताना आगीने क्षणार्धात होत्याचे नव्हते केले. ऊस काढणीच्या टप्प्यावर असताना ही घटना घडल्याने पाटील यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पिकाबरोबरच ठिबक सिंचन संचही आगीत जळाल्याने पुढील शेतीच्या कामांसमोरही अडचणी निर्माण झाल्या आहेत.

या घटनेमुळे महावितरणच्या वीजवाहिन्या आणि विद्युत यंत्रणेच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वीज यंत्रणेतील संभाव्य त्रुटींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker