राशीन सह परिसरातील भागात ड्रोनची करडी नजर! नागरिकांन मध्ये दहशतीचे वातावरण.

राशीन (प्रतिनिधी)जावेद काझी. :- काल रात्री मंगळवार दिनांक १७.७.२४ रोजी रात्री ९ ते २ च्या दरम्यान राशीन सह कानगुडवाडी ,देशमुख वाडी ,तोडकर वाडी, सोनाळवाडी, मोहिते वस्ती, ढगे वस्ती जानवरे वस्ती, व इतर ठिकाणी आकाशात ड्रोन घिरट्या घालत असल्याचे दिसून आले आहे .
अज्ञात ड्रोनच्या माध्यमातून हेरेगिरी करून चोरी करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा या परिसरातील नागरिकांमध्ये होत असून भीतीचे वातावरण तयार होताना दिसत आहे. असे प्रकार राशीन सह परिसरात या दोन महिन्यात अनेक वेळा पहावयास मिळणे आहे. या रात्री अप रात्री फिरणाऱ्या अज्ञात ड्रोनवर संबंधित प्रशासनाची काहीच कारवाई होताना दिसत नाही किंवा प्रशासनाला या बाबत गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
ड्रोनच्या फिरण्याबाबत नागरिकांमध्ये तर्क वितर्क काढले जात असून रात्री फिरणाऱ्या अज्ञात ड्रोनद्वारे चोरी , घरफोडी व इतर प्रकार घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून कानगुडेवाडी येथे दिनांक.११ जुलै रोजी मध्यरात्री १ते २ च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरी करत आजिनाथ तुकाराम कानगुडे, यांच्या घरातील पैंजण व काही वस्तू गेल्या असून लहू कानगुडे, यांच्या युनिकॉन
गाडीचे लॉक तोडून नेण्याचा प्रयत्न केला परंतु गाडी चालू न झाल्यामुळे प्रयत्न फसला, तर हनुमंत कानगुडे यांच्या घराची खिडकी उघडून vivo-y22 14000 रुपये किमतीचा मोबाईल चोरी झाली आहे. अशी माहिती हनुमंत कानगुडे यांनी दिली.तसेच परिसरातील इतर ठिकाणी चोऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे ड्रोन वर नागरिकांचा संशय वाढला आहे.
नेमके रात्री फिरणारा अज्ञात ड्रोन द्वारे चोरी की इतर काही गुपित हेरे गिरी होत आहे. या रात्री फिरणाऱ्या ड्रोन्स मागचा नेमका हेतू काय? हे पोलीस प्रशासनाने पडताळून पाहणे गरजेचे असून फिरणाऱ्या ड्रोन चा सुगावा लावावा अशी मागणी राशीन व परिसरातील नागरिकांकडून होताना दिसत आहे.
You are longer and then and to leave by now Those whose limbs are