कर्जत बाजार समितीच्या सभापती पदी भाजपचे काकासाहेब तापकीर यांची तर उपसभापती पदी अभय पाटील यांची निवड

कर्जत (प्रतिनिधी) : – कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी जिल्हा बँकेचे संचालक काकासाहेब तापकीर यांची तर उपसभापती पदी अभय पाटील यांची निवड झाली.कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली होती . भाजपचे आ.राम शिंदे व जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल ला ९ तर आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल ला ९ जागा मिळाल्या होत्या. प्रत्येकी ९ जागा मिळाल्या असल्याने सभापती व उपसभापती पदांची निवड ही दोन्ही आमदार यांच्या प्रतिष्ठेची झाली होती.यात कोण बाजी मारणार की ईश्वर चिठ्ठीने निवड होणार याकडे तालुक्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागले होते
आ.राम शिंदे यांनी माञ सभापती व उपसभापती पदाच्या निवडीत आ.रोहित पवार यांना धोबीपछाड देत कृषी उत्पन्न बाजार समिती ची सत्ता हस्तगत केली आहे.
सभापती पदा साठी भाजपकडून जिल्हा बँकेचे संचालक काकासाहेब तापकीर यांनी तर राष्ट्रवादी तर्फे जिल्हा परिषद चे मा.सदस्य गुलाब तनपुरे यांनी अर्ज भरले होते. मतदान प्रक्रिया सुरू झाली शेवटी काकासाहेब तापकीर यांना ९ मते पडली तर गुलाब तनपुरे यांना ८ मते पडली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे १ मत बाद झाले त्यामुळे काकासाहेब तापकीर हे १मत जादा घेत विजयी झाले तर उपसभापती पदा साठी भाजपचे अभय पाटील यांनी तर राष्ट्रवादी च्या वतीने श्रीहर्ष शेवाळे यांनी अर्ज दाखल केले यावेळी झालेल्या मतदानात अभय पाटील यांना १० तर श्रीहर्ष शेवाळे यांना ८ मते पडले.त्यामुळे अभय पाटील हे दोन मताने विजयी झाले बाद मत कोणाचे
सभापती पदाच्या निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १ मत बाद झाले ते नेमके कुणाचे याबाबत उलटसुलट चर्चा होत असून प्रत्येक संचालकांकडे संशयाने पाहिले जात आहे.तर व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीत राष्ट्रवादी काँग्रेस च्या कोणत्या संचालकाने विरूद्ध मतदान केले याबाबत ही मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे किती मते फुटली
कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे किती मते फुटली याबाबत संपूर्ण तालुक्यात चर्चाला उधाण आले असले तरी सभापती पदाच्या निवडीत मत बाद करणारा संचालक यानेच उपसभापती पदाच्या निवडीत विरोधात मत दिले की , उपसभापती पदाच्या निवडीत राष्ट्रवादी काँग्रेस च्या दुसरा संचालक फुटला हे मात्र गुलदस्त्यात आहे.