बौद्ध तरुणाच्या हत्येला जबाबदार गावगुंडांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे:आरपीआयचे जिल्हाउपाध्यक्ष दत्ता कदम

कर्जत (प्रतिनिधी) :- नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली या गावांमध्ये भिमजयंती साजरी केल्याचा राग मनात धरून तेथील गाव गुंडांनी अक्षय भालेराव या बौद्ध तरुणाची हात्या केली फुले,शाहू,आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्र मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून एका बौद्ध तरुणाची निर्घृणपणे हत्या केली जाते ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला कळीमा फासणारी व अतिशय निंदनीय गोष्ट आहे
या गावगुंडांवर कठोर कारवाई करून मयताच्या कुटुंबीयास आर्थिक मदत मिळणे बाबतचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कदम व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कर्जतचे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली येथील दलित तरुण अक्षय भालेराव या तरुणाने त्यांच्या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याचा राग मनात धरून गावातील काही गाव गुंडांनी अक्षय भालेराव या भीमसैनिकाची हत्या केली आहे. तरी या घटनेचा कर्जत तालुक्यांसह जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असून याबाबतचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. तसेच या निवेदनात पुढे म्हटले आहे की सदरच्या घटनेची चौकशी सीबीआय किंवा सीआयडी यांच्या मार्फत करण्यात येऊन सदरचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा व सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच पीडित कुटुंबाला राज्य सरकारने पन्नास लाख रुपयांची मदत करावी व त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घेऊन त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे तसेच सदरील घटनेचा निषेध म्हणून आम्ही सर्व भिमसैनिकांच्या वतीने मंगळवार दि.१३/०६/२०२३ रोजी एक दिवशीय दुपारी १२ वाजेपर्यंत कर्जत बंद करणार आहोत. तरी सर्वांनी सहकार्य करावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कदम यांनी या निवेदनातून करण्यात आली आहे.यावेळी विशाल काकडे,संतोष आखाडे, हमजत शेख, वसीम शेख, सनी वेळेकर, अक्षय भेलुमे, धीरज पवार, बापू डुकरे, शुभम चांगण, संतोष सोनवने, किरण भैलुमे, रोहन कदम यांच्यासह भीमसैनिक उपस्थित होते