pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
आरोग्य व शिक्षणब्रेकिंग
Trending

कोटा मेंटॉर्सचा गौरव: श्रीकांत कदमची आयआयटीसाठी उल्लेखनीय कामगिरी

Samrudhakarjat
4 6 1 4 6 5

कर्जत, २ जून – कर्जत शहरातील कोटा मेंटॉर्स संस्थेमध्ये शिक्षण घेणारा आणि परिश्रमाने यश मिळवणारा विद्यार्थी श्रीकांत संदीप कदम याची भारतातील सर्वोच्च आणि प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी (IIT) मध्ये निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संपूर्ण कर्जत शहरातून आणि शैक्षणिक वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

श्रीकांतने आपल्या चिकाटी, जिद्द आणि अभ्यासाच्या जोरावर ही अव्वल कामगिरी साध्य केली आहे. कोटा मेंटॉर्स कर्जत या संस्थेचे मार्गदर्शन आणि अत्याधुनिक शिक्षणपद्धती यामुळे त्याला हे यश मिळवणे शक्य झाले.

या यशाबद्दल कोटा मेंटॉर्स चे संस्थापक अध्यक्ष श्री.केशव आजबे सर यांनी श्रीकांतचे मन:पूर्वक अभिनंदन करताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

श्री. केशव आजबे हे बोलताना म्हणाले 

“श्रीकांत कदम हा आमच्या संस्थेचा अत्यंत मेहनती आणि अभ्यासू विद्यार्थी आहे. त्याने सतत अभ्यासात सातत्य ठेवून आपले लक्ष्य स्पष्ट ठेवले. आमच्या मार्गदर्शनात त्याने आयआयटीसाठी अत्यंत निष्ठेने तयारी केली आणि आज त्याचे स्वप्न साकार झाले. कोटा मेंटॉर्सचा हा अजून एक यशस्वी क्षण आहे. संपूर्ण टीमकडून त्याला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. तो भविष्यात एक उत्कृष्ट अभियंता होईल, याबाबत मला पूर्ण विश्वास आहे.”

श्रीकांतच्या या यशामुळे कर्जत शहराचे नाव उज्वल झाले असून, तो इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून मेहनत आणि योग्य मार्गदर्शन घेतल्यास अशक्य काहीच नाही, हे त्याने दाखवून दिले आहे.

श्रीकांत आणि त्याच्या पालकांचे, तसेच कोटा मेंटॉर्सचे सर्व शिक्षकवृंदांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker