google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

राम शिंदे यांच्यासमोर पुन्हा राजकीय अग्निपरीक्षा; उपनगराध्यक्षपदावरून कर्जत नगरपंचायतीत नवा ट्विस्ट

संघनिष्ठ ज्येष्ठ नगरसेविका ताराबाई सुरेश कुलथे व मोनाली तोटे यांचा ठाम दावा; दोन नगरसेविका बैठकीस गैरहजर, राजकीय समीकरणांना वेग

Samrudhakarjat
4 9 0 0 5 4

(कर्जत  प्रतिनिधी) :- कर्जत नगरपंचायतीतील नगराध्यक्षपदाचा पेच मिटताच आता उपनगराध्यक्षपदाच्या निवडीवरून राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. १५ जुलै रोजी होणाऱ्या विशेष सभेपूर्वीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ नगरसेविका ताराबाई सुरेश कुलथे त्यांच्यासोबत असणाऱ्या मोनाली ओंकार तोटे यांनी उपनगराध्यक्षपदावर ठाम दावा केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घडामोडीमुळे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासमोर पुन्हा एकदा निष्ठा, संघटन आणि राजकीय समतोल राखण्याची मोठी कसोटी निर्माण झाली आहे.

सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात प्रा. राम शिंदे यांनी आपल्या गटातील १३ नगरसेवकांची बैठक बोलावली होती. भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचे ११ नगरसेवक उपस्थित असताना ताराबाई कुलथे आणि मोनाली तोटे या दोन्ही नगरसेविका बैठकीस अनुपस्थित राहिल्या. त्यांच्या अनुपस्थितीमुळे नगरपंचायत राजकारणात नव्या समीकरणांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

संघासाठी आयुष्यभर कार्य केलेल्या कुटुंबाचा सन्मान होणार का?

कर्जत तालुक्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या उभारणीत कै. पोपटभाऊ कुलथे आणि कै. सुरेशकाका कुलथे यांचे योगदान अत्यंत मोलाचे मानले जाते. संघाच्या विचारांचा प्रसार, पक्ष संघटना मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्यात कुलथे कुटुंबाची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. भाजपला तालुक्यात मिळालेल्या यशामागे या कुटुंबाचा त्याग आणि सातत्यपूर्ण कार्याचा मोठा वाटा असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आजही आहे.

याच परंपरेचा वारसा पुढे नेत सचिनशेठ कुलथे यांनीही सामाजिक, धार्मिक आणि संघटनात्मक क्षेत्रात सक्रिय भूमिका निभावली आहे. संत नरहरी सोनार पायी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 

 शहरांमध्ये असणाऱ्या नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेड्याबाबळींचे साम्राज्य निर्माण झाले होते. नदीला पूर्वीचे वैभव प्राप्त व्हावे. पावसाचे पाणी पडल्यास कुठलाही अडथळा येऊ नये. यासाठी या सर्व वेड्या बाभळी नदीपात्रातून काढून संपूर्ण नदी पात्र स्वच्छ करण्याचा नुकताच सामाजिक उपक्रम देखील सचिन शेठ कुलथे यांनी राबवला. याशिवाय इतरही अनेक शहरातील सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो.

मैत्रीपेक्षा पक्षनिष्ठेला दिले प्राधान्य

राजकीय वर्तुळात चर्चेनुसार, माजी नगराध्यक्ष रोहिणी सचिन घुले यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला तेव्हाही सचिन कुलथे व ओंकार तोटे यांनी आपले जिवलग मित्र व व्यावसायिक भागीदार असलेल्या सचिन घुले यांच्यापेक्षा पक्षनिष्ठेला प्राधान्य देत प्रा. राम शिंदे यांच्या भूमिकेला साथ दिली. यापूर्वी उषा राऊत यांच्या अविश्वास प्रस्तावावेळीही त्यांनी राम शिंदे यांच्यासोबत ठाम भूमिका घेतली होती.

त्यामुळे “पक्षासाठी सातत्याने उभे राहिलेल्या कुलथे कुटुंबाला आता न्याय मिळणार का?” हा प्रश्न भाजप व संघ परिवारातील कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

उपनगराध्यक्षपदावर ठाम भूमिका

विश्वसनीय माहितीनुसार, ताराबाई कुलथे आणि मोनाली तोटे या दोन्ही नगरसेविकांनी आमच्यापैकी एकीला उपनगराध्यक्ष पदाची संधी द्यावी अशी उघड मागणी केली आहे. व उपनगराध्यक्ष पद अविश्वास प्रस्ताव संतोष मेहत्रे यांच्यावर मंजूर होण्यापूर्वी ह निवड प्राध्यापक राम शिंदे यांनी जाहीर करावी. अशी ठाम भूमिका घेतल्यामुळे मोठी कोंडी निर्माण झाली आहे.

भाजपच्या एक व घुले गटाच्या चार नगरसेवकांचा पाठिंबा कुलथे व तोटे यांना मिळत असल्याची चर्चा आहे. 

१५ जुलै निर्णायक

उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर १५ जुलै रोजी निर्णय होणार आहे. त्यानंतर नवीन उपनगराध्यक्षाची निवड होणार असल्याने सर्वांचे लक्ष आता प्रा. राम शिंदे यांच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे.

दरम्यान आज झालेल्या बैठकीमध्ये या सर्व घडामोडींचा आढावा प्राध्यापक राम शिंदे यांनी घेतला व नगरसेविका कुलथे व तोटे यांनाही संपर्क केल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली आहे.

कर्जत नगरपंचायतीतील ही निवड केवळ एका पदाची नसून, ती संघटननिष्ठा, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि नेतृत्वाच्या निर्णयक्षमतेची परीक्षा मानली जात आहे. दीर्घकाळ संघ आणि भाजपसाठी निष्ठेने काम करणाऱ्या कुलथे कुटुंबाला संधी देऊन संदेश दिला जातो की नवीन राजकीय समीकरणांना प्राधान्य दिले जाते, यावरून पुढील राजकारणाची दिशा निश्चित होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker