google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

बारडगाव सुद्रिक सोसायटीचा प्रा. राम शिंदे यांच्या नावाचा ठराव एकमताने मंजूर

भाजपच्या हालचालींना वेग; कर्जत-जामखेड मतदारसंघात निवडणुकीची रणनीती स्पष्ट

Samrudhakarjat
4 8 9 6 4 4

कर्जत | प्रतिनिधी :- अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने विधान परिषद सभापती प्रा. रामदास उर्फ राम शंकर शिंदे यांच्या नावाचा ठराव एकमताने मंजूर करून जिल्हा बँक निवडणुकीतील भाजपची भूमिका अधोरेखित केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ. सुनील गावडे, अंकुशराव गावडे, गणपत पाटील, लालासाहेब बरकडे, विलास जांभळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला. ठरावाचे सूचक किसन लक्ष्मण बरकडे, तर अनुमोदक किसन राजाराम जाधव होते.

यावेळी संचालक कांताबाई गावडे, महादेव साबळे, दीपक सुद्रिक, किसन जाधव, अक्षय गावडे, वसंत गावडे, लालासाहेब सोलंकर, दत्तात्रय गावडे, देविदास पांडुळे, किसन बरकडे, दिगंबर दराडे, सुभाष गावडे, कमल सुद्रिक आदींसह अनेक संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हा सहकारी बँकेच्या सोसायटी मतदारसंघातून उमेदवार सूचित करणे, उमेदवारी अर्ज दाखल करणे व मतदान करणे या प्रक्रियेसाठी बारडगाव सुद्रिक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने प्रा. राम शिंदे यांच्या नावाचा ठराव सर्वानुमते मंजूर केला. त्यामुळे कर्जत-जामखेड भागातील निवडणुकीची सूत्रे स्वतः प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

सभेचे कामकाज सचिव विठ्ठल वाघमारे व लिपिक दिलीप सुद्रिक यांनी पाहिले. ठराव मंजूर झाल्यानंतर उपस्थितांनी दिवंगत कै पुढारी सस्ते व कै कारभारी गावडे यांच्या कार्याची आठवण काढली. तसेच शांतीलाल कोपनर, सुनील काळे, काकासाहेब धांडे यांनी उपस्थितांचे अभिनंदन केले. भाजप तालुकाध्यक्ष अनिल गदादे यांनी बारडगाव सुद्रिक व ताजू परिसरातील ग्रामस्थ, संचालक आणि सर्व नेतेमंडळींचे आभार मानले.

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केल्याचे या ठरावातून स्पष्ट होत असून, आगामी काळात ही निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker