google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

तुकाईच्या जलक्रांतीत माळेवाडीला स्थान द्या!

लाभक्षेत्रात समावेशासाठी ग्रामस्थांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना साकडे

Samrudhakarjat
5 5 1 3 5 0

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील दुष्काळी भागासाठी जलसंजीवनी ठरणाऱ्या तुकाई उपसा सिंचन योजनेचा भूमिपूजन व कार्यारंभ सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला ऐतिहासिक यश मिळाल्यानंतर आता या योजनेच्या लाभक्षेत्रात माळेवाडी गावाचाही समावेश करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे.

गेल्या दहा वर्षांच्या संघर्षानंतर साकार झालेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे कर्जत तालुक्यातील १९ दुष्काळी गावांमधील पाणीटंचाई दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तब्बल ६६ कोटी ८३ लाख रुपये खर्चाच्या या योजनेअंतर्गत कुकडी डाव्या कालव्याचे पाणी उचलून २७ जलसाठे भरले जाणार असून, ५९९ हेक्टर शेती क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या योजनेच्या कार्यारंभामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

माळेवाडी हे गाव प्रामुख्याने शेतीप्रधान व अवर्षणप्रवण असून, गावातील बहुसंख्य नागरिक शेती आणि दुग्धव्यवसायावर अवलंबून आहेत. सिंचनाच्या पुरेशा सुविधा नसल्याने येथील शेतकऱ्यांना दरवर्षी पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतीचे नियोजन करणे कठीण होत असून, त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर होत आहे.

तुकाई उपसा सिंचन योजनेचे लाभक्षेत्र माळेवाडी गावाच्या जवळ असल्याने या गावाचाही योजनेत समावेश करण्यात यावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. योजनेचे पाणी गावातील तलाव, ओढे किंवा शेतीसाठी उपलब्ध करून दिल्यास शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली येण्यास मदत होईल. तसेच गावातील पाणीटंचाई दूर होऊन शेती आणि दुग्धव्यवसायाला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

तुकाई उपसा सिंचन योजनेच्या कार्यारंभामुळे कर्जत तालुक्यातील दुष्काळी गावांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र, या योजनेचा लाभ माळेवाडी गावालाही मिळावा, यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी लक्ष घालून माळेवाडी गावाचा योजनेच्या लाभक्षेत्रात समावेश करण्यासाठी संबंधित जलसंपदा विभागाला आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

तुकाई उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून माळेवाडी गावाला पाणी मिळाल्यास गावाच्या विकासाला नवी दिशा मिळेल. शेतीला सिंचनाची सुविधा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे.

या मागणीसाठी संदिप अंकुश धावडे आणि अमोल कृष्णा खराडे यांनी समस्त ग्रामस्थांच्या वतीने निवेदन दिले आहे. तुकाईच्या जलक्रांतीत माळेवाडी गावालाही सहभागी करून घ्यावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker