उपोषणकर्त्या भीमसैनिकांच्या समर्थनार्थ रिपाईचे कर्जत नगरपंचायतीला टाळे ठोको आंदोलन!
रमाई आवास योजनेचा पहिला हप्ता तातडीने वर्ग करण्याची मागणी; भीमसैनिकांच्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जाहीर पाठिंबा


कर्जत प्रतिनिधी : रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळावा, या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या भीमसैनिकांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने कर्जत नगरपंचायतीला टाळे ठोको आंदोलन करण्यात आले. उपोषणकर्त्या भीमसैनिकांच्या मागण्यांची दखल घेऊन नगरपंचायत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा आणि रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी रिपाई चे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कदम रिपाई चे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकुश भैलुमे बाधकाम सभापती भास्कर भैलुमे रिपाईचे युवक उपाध्यक्ष विशाल काकडे याच्या वतिने करण्यात करण्यात आली.
रमाई आवास योजनेचा पहिला हप्ता रखडल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून, या प्रश्नावर भीमसैनिकांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. उपोषणकर्त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने आंदोलनात सक्रिय सहभाग घेत नगरपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधले.
दिनांक १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता मुख्याधिकारी साळवे, नगराध्यक्षा छाया शेलार, सतीश पाटील आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलकांसोबत चर्चा झाली होती. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी नगरपंचायतीने आवश्यक ठराव मंजूर करून दिल्यास विशेष सभेच्या ठरावाच्या आधारे रमाई आवास योजनेचा पहिला हप्ता तात्काळ वर्ग करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते.
त्यानंतर नगराध्यक्षा छाया शेलार, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक-नगरसेविकांनी तातडीने विशेष सभा घेऊन आवश्यक ठराव मंजूर करावा, असे आवाहन रिपाईच्या वतीने करण्यात आले होते. मात्र, उपोषणकर्त्या भीमसैनिकांच्या मागणीवर तातडीने निर्णय होत नसल्याने रिपाईने टाळे ठोको आंदोलन करून आपला पाठिंबा जाहीर केला.

रमाई आवास योजना ही गोरगरीब आणि गरजू कुटुंबांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणारी योजना आहे. या योजनेचा पहिला हप्ता मिळावा यासाठी भीमसैनिक उपोषणाला बसले असताना त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होऊ नये, ही भूमिका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने घेतली आहे.
नगरपंचायतीने विशेष सभा घेऊन ठराव मंजूर केल्यास पहिला हप्ता वर्ग करण्याची तयारी मुख्याधिकाऱ्यांनी दर्शवली असताना विशेष सभा घेण्यास विलंब का होत आहे, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला
उपोषणकर्त्या भीमसैनिकांच्या मागण्यांची तातडीने पूर्तता करावी, विशेष सभा आयोजित करून रमाई आवास योजनेचा ठराव मंजूर करावा आणि लाभार्थ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी रिपाईच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
या आंदोलनात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कदम आणि उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकुश भैलुमे बाधकाम सभापती भास्कर भैलुमे रिपाई चे युवक चे जिल्हा उपाध्यक्ष विशाल काकडे यांनी पुढाकार घेतला.
“भीमसैनिक आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणे ही आमची भूमिका आहे. रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आणि पहिला हप्ता वर्ग होण्याची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होईपर्यंत हा लढा सुरूच राहील,” असा निर्धार रिपाईच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
उपोषणकर्त्या भीमसैनिकांच्या समर्थनार्थ रिपाईने केलेल्या या आंदोलनामुळे रमाई आवास योजनेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आता नगरपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यावर कोणता निर्णय घेतात, याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.यावेळी कर्जत शहरातील सर्व भिम सैनिक उपस्थित होते.



