सेवा संकल्प अभियानात कर्जत मंडलाची बाजी!
अनिल भैय्या गदादे यांचा जिल्हा भाजपाकडून विशेष सन्मान; प्रा ,राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गौरव!


कर्जत (प्रतिनिधी) : – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’त अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्यात कर्जत मंडलाने उल्लेखनीय कामगिरी केली. प्रदेश भाजपाने दिलेले विविध सेवा उपक्रम नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल भाजपा कर्जत तालुकाध्यक्ष अनिल भैय्या गदादे यांचा जिल्हा भाजपाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गदादे यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर, विनायक देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, विश्वनाथ कोरडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सेवा संकल्प अभियानांतर्गत कर्जत मंडलात रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, अंगणवाडी सेविकांचा सन्मान, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, शासकीय योजनांची माहिती व लाभ मिळवून देण्यासाठी शिबिरे तसेच पत्रकारांसाठी अपघाती विमा अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन सभापती प्रा. राम शिंदे,जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग आणि जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर यांच्या उपस्थितीत पार पडले
या अभियानाच्या यशस्वीतेसाठी मंडलातील नेते, पदाधिकारी, बूथप्रमुख आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने परिश्रम घेतले. विविध उपक्रमांना नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कर्जत मंडलाने दाखवलेली संघटनात्मक ताकद आणि सामाजिक बांधिलकी जिल्ह्यासाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

या प्रसंगी तालुक्यातील संचालक प्रकाश शिंदे, काकासाहेब धांडे, दादासाहेब सोनमाळी, विनोद दळवी, प्रसाद ढोकरीकर, प्रतिभा रेणुकर, सुनील काळे, संजय नेवसे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



