google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

विनापरवाना फटाके विक्रेत्यांवर कडक कारवाई करा; राशीन फटाका असोसिएशनचे पोलीस प्रशासनाला निवेदन

Samrudhakarjat
5 3 7 8 4 2

राशीन (प्रतिनिधी : जावेद काझी) :

राशीन व परिसरात बेकायदेशीरपणे आणि कोणत्याही शासकीय परवान्याशिवाय सुरू असलेल्या फटाका विक्रेत्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ‘राशीन फटाका असोसिएशन’च्या वतीने पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात असोसिएशनने राशीन दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुळीक साहेब यांना लेखी स्वरूपाचे निवेदन सादर केले आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, राशीन व परिसरातील अधिकृत फटाका व्यावसायिक दरवर्षी सालाबादाप्रमाणे शासनाने घालून दिलेल्या सर्व अटी, शर्ती व सुरक्षेच्या नियमांचे तंतोतंत पालन करून रीतसर परवाना (लायसन्स) मिळवूनच फटाक्यांची दुकाने थाटतात. परंतु, सध्या राशीन शहरात व लगतच्या भागात काही व्यापाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची शासकीय परवानगी न घेता विनापरवाना फटाके विक्रीची दुकाने सुरू केली आहेत.

नियमबाह्य व बेकायदेशीरपणे लागणाऱ्या या दुकानांमुळे रीतसर शासकीय कर व फी भरून परवाना घेणाऱ्या अधिकृत व्यावसायिकांवर मोठा आर्थिक अन्याय होत आहे. तसेच सुरक्षेच्या उपाययोजना न करता सुरू असलेल्या अशा दुकानांमुळे अनुचित प्रकार घडल्यास सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या विनापरवाना फटाका विक्रेत्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदन देतेवेळी राशीन फटाका असोसिएशनचे अध्यक्ष सदाशिव मासाळ, उपाध्यक्ष श्रीकांत साळवे, सचिव समीर दोशी यांच्यासह असोसिएशनचे इतर सर्व अधिकृत परवानाधारक व्यावसायिक व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker