google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री जगदंबा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

Samrudhakarjat
5 3 4 2 7 7

राशीन (प्रतिनिधी): जावेद काझी.

कोजागिरी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर येथील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान असलेल्या श्री जगदंबा देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. शरद ऋतूतील अमृतमयी चांदण्यात न्हाऊन निघालेल्या राशीन नगरीत काल रात्रीपासूनच भक्तीचा पूर आल्याचे पाहायला मिळाले.

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मंदिर प्रशासनाच्या वतीने गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट आणि नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सायंकाळपासूनच स्थानिक नागरिकांसह शेजारील गावांमधून आणि दूरवरून आलेल्या भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. ‘आई राजा उदो उदो’ च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.

या उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या मध्यरात्री २ च्या सुमारास मानकरी संदीप पोतदार यांच्या हस्ते भाळंदे रखरखतीअग्नी ज्वाला कुंड हातात घेऊन जगदंबा देवीची महाआरती पूजा करण्यात आली महाआरतीनंतर, मंदिर परिसरात अग्नि कलश घेऊन प्रदक्षिणा घालण्यात आली . देवीला केशरयुक्त दुधाचा नैवेद्य दाखवण्यात आला. त्यानंतर मंदिरात उपस्थित हजारो भाविकांना तीर्थ आणि मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. पौर्णिमेच्या रात्री चंद्रकिरणांमध्ये ठेवलेले दूध प्राशन करण्यासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी श्री जगदंबा देवस्थान ट्रस्ट , तहसीलदार साहेब,ग्रामपंचायत, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, मानकरी, सेवेकरी, यांच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवला होता, ज्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी असूनही भाविकांना अत्यंत सुलभतेने आणि शांततेत दर्शन घेता आले. पालखी सोहळ्या दरम्यान राशीन परिसरातील रस्ते गुलालमय झाले असताना राशिन येथील कामाच्या ख्यातीमुळे पुरस्कार प्राप्त असणारे सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत तालुका उप अभियंता श्री सुनील सौताडे यांनी दुष्काळमय परिस्थिती असताना संपूर्ण राशीन गावात टँकरद्वारे पाणी फवारणी करून गुलालमय झालेले रस्ते स्वच्छ करण्यास मोलाचे योगदान लाभले. या कौतुकास्पद केलेल्या कामा बाबत राशीन परिसरातून सौताडे यांच्यावर अभिनंदन चा वर्षाव होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker