google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

श्री जगदंबा देवीचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न; ‘उदो बोला उदो’च्या जयघोषाने राशीन नगरी दुमदुमली.

Samrudhakarjat
5 2 9 9 1 9

राशीन (प्रतिनिधी – जावेद काझी) :

महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या श्री जगदंबा देवीचा वार्षिक पालखी सोहळा यंदा अफाट उत्साह, धार्मिक परंपरेचे पालन आणि भक्तिमय वातावरणात अत्यंत दिमाखात पार पडला. रात्री ठीक बारावेळेनंतर देवीने कौल दिल्यानंतर मानाच्या ठरलेल्या मार्गावरून पालखी मार्गस्थ झाली. याप्रसंगी संपूर्ण राशीन नगरीत “उदो बोला उदो… अंबाबाईचा उदो उदो” असा कानठळ्या बसवणारा जयघोष दुमदुमला होता.

मनमोहक रूप आणि नेत्रदीपक सोहळा

उत्सवाच्या निमित्ताने ट्रॅक्टरमध्ये अत्यंत आकर्षक पद्धतीने व सुवासिक फुलांनी सजवलेल्या आसनावर देवीची मूर्ती विराजमान करण्यात आली होती. हे मनमोहक रूप डोळ्यात साठवून घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. ढोल-ताशांच्या निनादात, लेझीमच्या तालावर, गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत पालखी सोहळा अत्यंत उत्साहात पुढे सरकला. या नयनरम्य दृश्याने उपस्थितांचे डोळे दीपवून टाकले.

भाविकांची अलोट गर्दी

पालखी उत्सव सुरू झाल्यापासूनच सकाळपासून राशीनमध्ये राज्यभरातून आलेल्या भाविक-भक्तांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. लांबच लांब रांगेत उभे राहून भाविकांनी देवीचे दर्शन घेतले व कृतकृत्य झाले. या धार्मिक महोत्सवामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले.

जत्रेत बालगोपाळांचा आणि महिलांचा उत्साह

पालखी सोहळ्यानिमित्त भरलेल्या वार्षिक जत्रेत बच्चेकंपनीसाठी विविध मनोरंजनाची साधने मोठी आकर्षण ठरली. ‘मौत का कुवा’ (वेल ऑप डेथ), विविध प्रकारचे पाळणे, खेळणी आणि मनोरंजक खेळांचा लहानांनी मनसोक्त आनंद घेतला. दुसरीकडे, मिठाई, स्टेशनरी, कटलरी आणि सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानांवर महिलावर्गाने खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.

कर्जत पोलिसांचा चोख बंदोबस्त

पालखी सोहळा व जत्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड आणि त्यांच्या संपूर्ण पोलीस पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांच्या या उत्कृष्ट आणि कडेकोट नियोजनामुळे हा मोठा धार्मिक सोहळा अत्यंत शांततापूर्ण, सुसंस्कृत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker