google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

नांदगावचे मुख्याध्यापक महादेव सायकर यांना राज्यस्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’; राशीन येथे मान्यवरांच्या हस्ते जंगी सत्कार

Samrudhakarjat
5 3 4 2 6 6

राशीन( प्रतिनिधी )जावेद काझी.

शिवपार्वती विकास संस्था राशीन संचलित, न्यू इंग्लिश स्कूल आखोणी संस्थेचे संस्थापक माननीय श्री. डॉक्टर राजकुमार आंधळकर यांच्या शुभहस्ते आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत नांदगाव येथील श्री रोकडेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. महादेव सायकर सर यांचा विशेष नागरी सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. श्री. सायकर सर यांना नुकताच ‘राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ मिळाल्याबद्दल त्यांच्या या दैदिप्यमान यशाचा गौरव करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शिक्षकी पेशाचा सन्मान आणि शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाची दखल घेत श्री. सायकर सर यांना या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राशीन येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित म्हणून न्यू इंग्लिश स्कूल आखोणी येथील सहशिक्षक लालासाहेब शेलार, राशिन बीटचे कर्तव्यदक्ष कृषी अधिकारी भोसले साहेब, तसेच मान्यवर श्री. रामदास काळे आदि उपस्थित होते.

सत्कारप्रसंगी बोलताना डॉ. राजकुमार आंधळकर यांनी सायकर सरांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला. “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन, त्यांच्यात संस्कार रुजवणारे सायकर सर हे आदर्श शिक्षक आहेत. त्यांना मिळालेला हा राज्यस्तरीय पुरस्कार त्यांच्या अविरत कष्टाचे फळ आहे,” अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार न्यू इंग्लिश स्कूल आखोणीचे सहशिक्षक लालासाहेब शेलार यांनी मानले. या सोहळ्यासाठी परिसरातील अनेक शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच सायकर सरांवर अभिनंदनाचा वर्षाव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker