google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

कर्जतच्या व्यापारी विश्वात नवी भरारी! राज्यपातळीवर झेप घेण्यासाठी व्यापारी असोसिएशन सज्ज

कर्जत तालुका व्यापारी असोसिएशनची नूतन कार्यकारणी जाहीर; योगेश भापकर यांच्या पुढाकारातून उद्योग-व्यापाराला मिळणार नवी दिशा

Samrudhakarjat
5 3 7 0 2 5

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्याला अग्रगण्य व्यावसायिक तालुका म्हणून नवी ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने कर्जत तालुका व्यापारी असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. स्थानिक उद्योग-व्यापाराला राज्यपातळीवर पोहोचविण्यासह छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना संघटित करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी असोसिएशनने नवी रणनीती आखली आहे. असोसिएशनचे खजिनदार तथा कर्जतमधील उद्योजक योगेश भापकर यांच्या विशेष पुढाकारातून नूतन व्यापारी कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून, या घोषणेमुळे तालुक्यातील व्यापारी आणि उद्योजकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कर्जत तालुक्यातील व्यापाऱ्यांना एकत्र आणून त्यांच्या व्यवसायाला संरक्षण देणे, नवीन उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, हे असोसिएशनचे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे. विशेषतः महिला उद्योजिकांना व्यवसायात पुढे येण्यासाठी प्रोत्साहन आणि आवश्यक पाठबळ देण्यावर भर दिला जाणार आहे.

शेतीपूरक उद्योगांना चालना देण्यासाठी विशेष कार्यशाळा आयोजित करणे, वस्तूंच्या आयात-निर्यातीबाबत चर्चासत्रे घेणे, नवउद्योजकांना उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन करणे, तसेच व्यापाऱ्यांना सुलभ कर्जपुरवठा आणि विविध विमा योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र विभाग कार्यरत केला जाणार आहे.

व्यापाऱ्यांना अडचणीच्या काळात तातडीने मदत मिळावी, यासाठी असोसिएशनच्या वतीने २४ तास मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. यासाठी ९५२२२२१६१६ हा संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासह उद्योगविश्वातील नवनवीन संधींची माहिती देण्याचे काम या माध्यमातून केले जाणार आहे.

नूतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष : विजय नाना मोढले उपाध्यक्ष : ॲड. सुधीर भापकर सचिव : स्वप्नील देसाई सहसचिव : विलासराव तोरडमल खजिनदार : योगेश भापकर संचालक : रावसाहेब खिळे, अमोल सोनमाळी, संजय काकडे, गणेश जेवरे.

कर्जत तालुक्यातील व्यापार, उद्योग आणि उद्योजकतेला संघटित व्यासपीठ मिळवून देत स्थानिक व्यवसायांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा असोसिएशनचा मानस आहे. नव्या कार्यकारणीच्या माध्यमातून कर्जतच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार का, याकडे आता व्यापारी वर्गाचे लक्ष  लागले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker