राशिन येथे स्मार्ट मीटरविरोधात बहुजन समाज पार्टीचे उपोषण; महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर मागे


राशिन (प्रतिनिधी) : जावेद काझी शुक्रवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ ग्रामपंचायत कार्यालयासमोर स्मार्ट मीटरच्या विविध मागण्या आणि वीज ग्राहकांच्या समस्यांसंदर्भात बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) वतीने सुरू करण्यात आलेले उपोषण महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. बसपाचे जिल्हा प्रभारी दत्तात्रय सोनवणे यांनी हे उपोषण छेडले होते.
स्मार्ट मीटरचे वाढीव वीज बिल आणि ग्राहकांच्या विविध तक्रारींबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. तसेच वीज ग्राहकांच्या अडचणी आणि तक्रारींचे नियमानुसार त्वरित निवारण केले जाईल, असे स्पष्ट लेखी आश्वासन महावितरणचे राशिन शाखा सहाय्यक अभियंता रघुनाथ भारत शिंदे यांनी दिले. त्यानंतर हे उपोषण अधिकृतपणे मागे घेण्यात आले.

सकाळपासून सुरू झालेल्या या उपोषणास स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी मोठा पाठिंबा दर्शवला. यामध्ये राजू सोनवणे, विशाल दीपक माने, श्रीकांत चंद्रकांत धुमाळ, आनंद भालचंद्र कांबळे, विठ्ठल चंद्रकांत गायकवाड, हरी दत्तू साळवे, भारत साळवे, भारत गेहलोत, अंगद दामोदरे, सुनील चितारे, अमोल जाधव, रवींद्र साळवे,सुरज साळवे, माऊली प्रभाकर सायकर, किरण बाबा जाधव, अंकुश महादेव साळवे, गणेश साळवे, किसन लक्ष्मण आढाव यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महावितरणच्या सकारात्मक भूमिकेमुळे उपोषणकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.



