google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

राशीनमध्ये राजे बचत गटातर्फे दिवाळीनिमित्त सभासदांना ३ कोटींचे वाटप!

शेकडो कुटुंबांना मिळाले आर्थिक बळ; नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव

Samrudhakarjat
5 4 0 7 3 3

राशीन (प्रतिनिधी) :

कर्जत तालुक्यातील राशीन येथील ‘राजे बचत गटा’च्या वतीने दिवाळीच्या निमित्ताने अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे. या बचत गटांतर्गत सुमारे २०० सभासदांना तब्बल ३ कोटी रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले आहे. याविषयीची माहिती बचत गटाचे अध्यक्ष शहाजीराजे राजेभोसले व सचिव अभिषेक रेणुकर यांनी दिली आहे. या भरघोस आर्थिक वाटपावरून राशीनकरांचा राजे गटावर असलेला गाढ विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

उद्योग-व्यवसायांना मिळणार बळ

राजे बचत गटाच्या माध्यमातून राशीन आणि परिसरातील अनेक होतकरू, कष्टाळू युवक-युवती, महिला तसेच लहान-मोठ्या दुकानदारांना व व्यापाऱ्यांना नेहमीच मोठे आर्थिक पाठबळ दिले जाते. या आर्थिक सहाय्यामुळे अनेक कुटुंबांमधील सदस्यांना स्वतःचे उद्योग-व्यवसाय उभारण्यास आणि संकटाच्या काळात आर्थिक स्थैर्य मिळण्यास मोठी मदत होत आहे. बचत गटाच्या या पारदर्शक कारभारामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

नवीन बचत गट सुरू करण्याची सभासदांची मागणी

बचत गटाच्या या उत्कृष्ट अनुभवामुळे आणि अध्यक्ष शहाजीराजे यांच्यावरील अगाध विश्वासापोटी, उपस्थित सभासदांनी नवीन दुसरा बचत गट सुरू करण्यासाठी एकमुखाने मागणी केली. सभासदांच्या या मागणीचा सर्वतोपरी आदर करत, लवकरच नवा बचत गट सुरू करण्यात येईल, असे सकारात्मक आश्वासन यावेळी अध्यक्षांनी दिले.

राजे बचत गटाच्या या लोककल्याणकारी व आर्थिक सक्षमीकरणाच्या उपक्रमाबद्दल राशीन आणि परिसरातून अध्यक्ष शहाजीराजे राजेभोसले व त्यांच्या संपूर्ण टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker