शिवस्मित दूध संकलन व शीतकरण केंद्रात दिवाळी बोनस वाटप सोहळा उत्साहात संपन्न


कर्जत तालुक्यातील धालवडी येथे शिवस्मित दूध संकलन व शीतकरण केंद्र तर्फे सर्व दूध उत्पादक सभासदांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बोनस वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राशीन येथील मा.श्री. विवेक नारायण जगताप ( संचालक – जगदंबा दूध डेअरी & यशोमय्या पतसंस्था राशिन), सुदर्शन भैया कोपनर (उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर), कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व कर्जत तालुक्याचे शिवसेनाप्रमुख बळीराम यादव यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान धालवडीचे सरपंच पोपटराव पवार यांनी भूषविले. उमेश जगताप ( माजी सरपंच धालवडी), संजय खोडवे ( माजी सरपंच धालवडी),दत्ता चौधरी ( माजी सरपंच धालवडी),बाप्पूराव सुपेकर ( माजी सरपंच धालवडी), हेमंत गुंड ( माजी सरपंच कुळधरण)
यांसह सर्व सन्माननीय दूध उत्पादक सभासद उपस्थित होते.

या प्रसंगी केंद्रातील पहिल्या मानाच्या पाच उत्कृष्ट दूध उत्पादक सभासदांचा फेटे बांधून व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये उमेश जगताप – प्रथम क्रमांक, बाळासाहेब सुपेकर – द्वितीय क्रमांक, गणेश कोपनर – तृतीय क्रमांक, वाल्मीक पवार – चौथा क्रमांक आणि हानूमत तांबे – पाचवा क्रमांक यांचा समावेश होता.
या वेळी विवेक जगताप म्हणाले, “दूध संकलन हा केवळ व्यवसाय नसून तो शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडित आहे. दिवाळी सारख्या पवित्र सणानिमित्त शेतकरी बांधवांना आर्थिक आधार मिळावा म्हणून बोनस देण्यात येणे हा एक आदर्श उपक्रम आहे.”

सुदर्शन भैया कोपनर यांनी चेअरमन गोकुळ पवार व शिवस्मित दूध डेअरीचे सर्व संचालकांचे अभिनंदन करताना सांगितले, “शेतकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्याबरोबरच बेसळमुक्त व उच्च प्रतीचे दूध उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी वर्गाने सहकार्य करावे,” अशी अपेक्षा व्यक्त केली.
या बोनस वितरणामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी केंद्राचे आभार मानले.
केंद्राचे चेअरमन गोकुळ पवार म्हणाले, “शेतकरी बांधवांच्या सातत्यपूर्ण परिश्रमामुळेच केंद्राने प्रगतीचा टप्पा गाठला आहे. त्यांचे योगदानच आमचे बळ आहे. त्यांच्या कष्टाची दखल म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी बोनस देण्यात आला आहे. आगामी काळातही दूध उत्पादकांना सर्वोत्तम दर व सुविधा देण्यासाठी केंद्र कटिबद्ध आहे.”
या सोहळ्याचे सूत्रसंचालन लालासाहेब शेलार सर यांनी केले, तर उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बोनस वाटप करण्यात आले. कार्यक्रमानंतर सर्व सभासदांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी बांधवांच्या आनंदातच शिवस्मित डेअरीचे यश सामावले आहे!



