google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

चिलवडीत श्रीरंग (तात्या) सरकाळे पाटील यांचा १०० वा अभिष्टचिंतन सोहळा; ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाची मेजवानी!

Samrudhakarjat
5 3 9 5 0 5

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील चिलवडी (सरकाळेवस्ती) येथे मा. श्री. श्रीरंग (तात्या) बाबाजी सरकाळे पाटील यांच्या १०० व्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. ७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे.

या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त प्रसिद्ध कीर्तनकार विनोदाचार्य ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत कीर्तनाचा कार्यक्रम होणार असून, त्यांच्या कीर्तनातून उपस्थितांना अध्यात्म, भक्ती आणि समाजप्रबोधनाचा लाभ मिळणार आहे.

श्रीरंग (तात्या) सरकाळे पाटील यांच्या शतायुषी वाटचालीचा गौरव करण्यासाठी मित्रपरिवार व सरकाळे पाटील परिवाराच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक राहुल सरकाळे पाटील मित्र परिवार व समस्त सरकाळे पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे ठिकाण : चिलवडी (सरकाळेवस्ती), ता. कर्जत, जि. अहिल्यानगर.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker