google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

मध्यरात्रीपासून चिलवडी गावठाण अंधारात; जनजीवन विस्कळीत

महावितरणकडून दुरुस्तीचे काम सुरू; लवकरच वीजपुरवठा सुरळीत होण्याची ग्वाही

Samrudhakarjat
5 4 7 0 1 0

राशीन प्रतिनिधी जावेद काझी. :- परीटवाडी परिसरात मध्यरात्री चिलवडी गावठाण विद्युत वाहिनीची तार तुटल्याने पहाटे तीन वाजल्यापासून संपूर्ण चिलवडी गावठाण व लगतचा परिसर अंधारात बुडाला आहे. सलग वीजपुरवठा खंडित झाल्याने या वाहिनीवर अवलंबून असलेल्या नागरिकांचे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे.

या प्रकाराची माहिती मिळताच महावितरणचे अधिकारी रघुनाथ शिंदे यांनी तात्काळ संबंधित कंत्राटदार चुंबळकर यांच्याशी संपर्क साधून खंडित झालेला वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या. सध्या घटनास्थळी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच चिलवडी गावठाण विद्युत वाहिनीवरून वीजपुरवठा सुरळीत होईल, अशी खात्री कंत्राटदार चुंबळकर यांनी दिली आहे.

दरम्यान, याबाबत विद्युत अभियंता रघुनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुरुस्तीचे काम तातडीने सुरू असून वीजपुरवठा लवकरच पूर्ववत होईल, अशी ग्वाही दिली. तसेच चिलवडी गावठाण परिसरात वारंवार उद्भवणाऱ्या विद्युत वाहिन्यांच्या तक्रारी कायमस्वरूपी दूर केल्या जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker