कै. रावसाहेब देशमुख यांच्या २२ व्या पुण्यस्मरणानिमित्त ह भ प ज्ञानेश्वर महाराज माऊली पठाडे यांचे प्रवचन.


राशीन प्रतिनिधी जावेद काझी. :- रावसाहेब देशमुख नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्या वतीने संस्थेचे प्रेरणास्थान कै. रावसाहेब देशमुख (बाबा) यांच्या २२ व्या पुण्यस्मरणानिमित्त गुरुवार (दि. २६ नोव्हेंबर) रोजी सकाळी ११ वाजता मुख्य कार्यालयात युवकवीर ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज पठाडे यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.
आध्यात्मिक आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करत संस्थेच्या वाटचालीला भक्कम दिशा देणाऱ्या कै. रावसाहेब देशमुख यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा सोहळा होत आहे. या निमित्ताने होणाऱ्या प्रवचनातून भाविक व नागरिकांना आध्यात्मिक व सामाजिक प्रबोधनाचा लाभ होणार आहे.

कै. रावसाहेब देशमुख यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत पतसंस्थेने सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र आणि विश्वासार्ह ओळख निर्माण केली आहे. सभासद व ठेवीदारांच्या हिताला प्राधान्य देत संस्थेकडून ठेवींवर आकर्षक व्याजदर दिला जात असून, संस्थेचा कारभार गतिमान झाला आहे. सध्या पतसंस्था २२५ कोटी रुपयांच्या ठेवींच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत आहे.
या स्मृतिदिन व प्रवचन सोहळ्यासाठी संस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ, सल्लागार मंडळ, सभासद, ठेवीदार, हितचिंतक, कर्मचारी आणि दैनिक ठेव प्रतिनिधी यांच्या वतीने नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




