google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

राशीनच्या जीर्ण वेशीवरून ग्रामस्थांचा संताप; जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?

Samrudhakarjat
5 4 7 9 8 2

राशीन प्रतिनिधी जावेद काझी :- ‘गाव तसं चांगलं, पण वेशीला टांगलं’ ही म्हण पूर्वीच्या काळाशी सुसंगत होती; कारण त्यावेळी गाव वेशीच्या आत वसलेले होते. मात्र, बदलत्या काळानुसार राशीनची ओळख आता केवळ गावापुरती मर्यादित न राहता एक झपाट्याने वाढणारा शहरी भाग अशी झाली आहे. असे असतानाही राशीन ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य गावची वेस अत्यंत जीर्ण व खिळखिळी झाली असून, या वेशीखाली २४ तास सुरू असलेली नागरिकांची वर्दळ मोठी दुर्घटना घडण्यास आमंत्रण देत आहे.

या जीर्ण वेशीला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. वेशीखाली उभे राहून वर पाहिल्यास चिरलेल्या भागातून थेट आकाश दिसत असल्याचे भयावह चित्र सध्या पाहायला मिळत आहे. या धोकादायक परिस्थितीबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे अनेकदा लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.

वेशी कोसळण्याची आणि एखाद्या नागरिकाचा जीव गेल्याची दुर्दैवी वार्ता कानी पडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल राशीनमधील नागरिक उपस्थित करत आहेत. भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच, एखादी दुर्घटना घडल्यास त्यास सर्वस्वी ग्रामपंचायत प्रशासकाला जबाबदार धरण्यात यावे, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन या वेशीचे भक्कम व सुरक्षित बांधकाम करावे, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker