google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

कोरेगावात कृषिदूतांचे आगमन; शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन

Samrudhakarjat
5 5 0 9 9 0

कर्जत (प्रतिनिधी) : सदगुरू कृषी महाविद्यालय, मिरजगाव (ता. कर्जत) येथील ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक संलग्नता उपक्रमांतर्गत अभ्यास दौऱ्यानिमित्त कृषिदूतांचे कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथे आगमन झाले. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने कृषिदूतांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

स्वागत समारंभास ग्रामपंचायतीच्या सरपंच अंजली मुरकुटे, उपसरपंच दिलीप जाधव , प्रसाद साबळे ग्रामसेवक व इतर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

या अभ्यास दौऱ्यादरम्यान कृषिदूतांनी शेतकऱ्यांना शेतीविषयक विविध बाबींवर मार्गदर्शन केले. हंगामानुसार पीक पद्धती, रासायनिक खतांचा योग्य वापर कीटकनाशकांची फवारणी करताना घ्यावयाची काळजी कीटकनाशकांचा सुरक्षित वापर तसेच सेंद्रिय शेतीचे महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली.

आगामी तीन महिन्यांच्या कालावधीत विविध कार्यशाळा व उपक्रमांच्या माध्यमातून कृषिदूत करण बांदल, विशाल क्षीरसागर, जयेश शिंदे, अभिजित वीर, सारंग कोकाटे आणि यश टेकुडे हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

या उपक्रमासाठी श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान, मिरजगाव चे संस्थापक डॉ. शंकरशेठ नेवसे , अध्यक्षा कल्याणीताई नेवसे, संचालक सिद्धांत नेवसे, सचिव राजेंद्र गोरे, प्रशासकीय अधिकारी सखाराम राजळे, नोडल अधिकारी अण्णासाहेब रासकर, समन्वयक राहुल मेत्रे, सदगुरु कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बीटे, कार्यक्रम समन्वयक प्रा. चांगदेव माने, कार्यक्रम अधिकारी प्रा. वैभव शिंदे व इतर विषयक तज्ञ प्राध्यापक वर्गाचे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी शेती उत्पादनात सुधारणा व्हावी आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker