google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

कर्जत तालुक्यात मारहाणीची खळबळजनक घटना; १० ते ११ जणांविरोधात गुन्हा

Samrudhakarjat
5 5 4 9 5 9

कर्जत (प्रतिनिधी) : महाविद्यालयातील तरुणीला मेसेजला रिप्लाय दिल्याच्या कारणावरून १९ वर्षीय तरुणाला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून बहिरोबावाडीच्या जंगलात नेऊन बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात १० ते ११ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचोली काळदाते येथील अनिकेत अनिल काळदाते (वय १९) हा २६ नोव्हेंबर रोजी परीक्षा देऊन बाहेर पडला असताना पठारवाडी फाट्याजवळून त्याला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून बहिरोबावाडीच्या जंगलात नेण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. जंगलात नेल्यानंतर आरोपींनी अनिकेत याला लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी साखळ्या आणि लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

या मारहाणीत अनिकेतच्या उजव्या डोळ्याला लाकडी दांडक्याने गंभीर दुखापत झाली. आरोपींनी त्याचे कपडे काढून मारहाण केली, तसेच अनिकेत ला म्हणाले “तुझा संतोष देशमुख करतो” म्हणत १० ते ११ तरुणांचा बेदम हल्ला केला, तसेच मोबाईलमध्ये चित्रीकरण केले तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय गणेश विलास तोरडमल याने अनिकेतच्या गळ्यातील सोन्याचा बदाम तोडून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी आकाश तोरडमल, गणेश विलास तोरडमल, विटेकर यांच्यासह अन्य १० ते ११ जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 140(3), 119(1), 118(2), 352, 351(2), 189(2), 191(2), 191(3) आणि 190 अन्वये कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी अनिकेत याच्यावर उपचार सुरू असून, या घटनेचा पुढील तपास कर्जत पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker