google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

जलशुद्धीकरण केंद्रात कचरा आणि १३ कोटींची योजना ठप्प; राशीनमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा आंदोलनाचा इशारा

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन: विधानसभा प्रमुख सुभाष जाधव आक्रमक

Samrudhakarjat
5 5 2 0 6 5

राशीन (प्रतिनिधी – जावेद काझी): – राशीन शहरातील पाणीपुरवठा केंद्र परिसरातील कचऱ्याचे साम्राज्य आणि तब्बल १३ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना अपूर्ण असल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख सुभाष जाधव यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. या गंभीर समस्यांबाबत त्यांनी जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांना थेट निवेदनाद्वारे तीव्र इशारा दिला असून, मागण्या मान्य न झाल्यास भिगवण रोड येथील पाण्याच्या टाकीजवळ बेमुदत उपोषण, धरणे व आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

जलशुद्धीकरण केंद्र की कचरा डेपो?

नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी राशीन येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे, ज्याची देखभाल सध्या ग्रामपंचायतीकडे आहे. मात्र, अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे या केंद्राच्या आवारातच गावातील घनकचरा साठवला जात आहे. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने सुभाष जाधव यांनी जलशुद्धीकरण केंद्राच्या आवारातील कचरा तातडीने हटवून कचऱ्यासाठी पर्यायी जागा व्यवस्थापित करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे.

१३ कोटींच्या योजनेची चौकशी करण्याची मागणी

राशीन शहरासाठी मंजूर झालेल्या सुमारे १३ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या संथ आणि निकृष्ट कामावर निवेदनातून बोट ठेवण्यात आले आहे. कोट्यवधी रुपये खर्च होऊनही योजना अद्याप अपूर्णच आहे. अनेक ठिकाणी घरगुती नळ जोडण्या केल्या असल्या, तरी थेंबभरही पाणी नागरिकांना मिळालेले नाही. पाईपलाईनच्या गुणवत्तेबाबतही नागरिकांमध्ये मोठी शंका आहे. त्यामुळे या योजनेची निविदा प्रक्रिया, कामाची गुणवत्ता, मोजमाप पुस्तिका (MB) आणि कंत्राटदाराला दिलेली देयके या सर्वांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जाधव यांनी केली आहे.

शिवसेनेच्या प्रमुख मागण्या:

• जलशुद्धीकरण केंद्राच्या आवारातील कचरा तात्काळ हटवून तेथे कचरा टाकण्यास कायमची बंदी घालावी.

• १३ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेची तांत्रिक व आर्थिक बाबींसह निष्पक्ष चौकशी व्हावी.

• दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कडक कायदेशीर कारवाई करावी.

• योजनेचे काम गुणवत्तापूर्वक पूर्ण करून नागरिकांना पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी निश्चित कालमर्यादा ठरवावी.

• या निवेदनावर केलेल्या कारवाईचा अहवाल निवेदनकर्त्यांना लेखी स्वरूपात द्यावा.

प्रशासनाला पूर्वसूचना आणि प्रति पाठवल्या

मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे सुभाष जाधव यांनी स्पष्ट केले आहे. या निवेदनाच्या प्रती पाणीपुरवठा मंत्री (महाराष्ट्र राज्य), मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद अहिल्यानगर), महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय, प्रांत अधिकारी कर्जत, गटविकास अधिकारी कर्जत आणि पोलीस निरीक्षक कर्जत यांना माहिती व तात्काळ कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत. आता यावर प्रशासन काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण राशीन शहराचे लक्ष लागले आहे. याप्रसंगी राशिन ग्रामपंचायत कार्यालय कर्मचारी दया आढाव यांना निवेदन देताना नेते सुभाष जाधव समवेत राशीन शहर पदाधिकारी राशीन शहर प्रमुख जितेंद्र स्वामी शेटे, राशीन उपशहर प्रमुख अमृत जंजिरे, संदीप राऊत, अजित कानगुडे, साहिल शेख,शहर संघटक गणेश मोढळे, शाखाप्रमुख अमोल दळवी, सुनील काका दडगळ, सागर पगी, बाळासाहेब शेटे, ऋषिकेश परदेशी, बाबा तांबोळी इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व इतर निवेदन पोस्ट ऑफिस द्वारे रजिस्टर करून पाठवण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker