google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

‘सत्ता येते-जाते; जनसेवेचा संकल्प मात्र अटळ!’ – माजी नगराध्यक्ष सौ. रोहिणी सचिन घुले

कर्जतच्या नगराध्यक्ष पदाचा जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा; ३० वर्षांचा जनसेवेचा वारसा अधिक जोमाने पुढे नेण्याचा निर्धार

Samrudhakarjat
4 8 9 5 9 3

कर्जत (प्रतिनिधी) : “सत्ता ही कायमस्वरूपी नसते. ती येते आणि जाते; परंतु जनतेची सेवा हीच आमची खरी ओळख आणि आयुष्यभराची जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन कर्जतच्या माजी नगराध्यक्ष सौ. रोहिणी सचिन घुले यांनी केले. त्यांनी नुकताच आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी शहरातील नागरिकांशी संवाद साधत आपल्या पुढील कार्याची दिशा स्पष्ट केली.

गेल्या ३० वर्षांपासून आमचे कुटुंबप्रमुख प्रवीणदादा घुले यांच्या नेतृत्वात सुरू असलेला जनसेवेचा वारसा अधिक वेगाने आणि व्यापक स्वरूपात पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करत, त्यांनी शहरातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.

राजीनाम्यानंतर पत्रकारांशी बोलताना माजी नगराध्यक्ष सौ. घुले म्हणाल्या की, “गेल्या तीन दशकांपासून कर्जतसह तालुक्यात सुरू असलेली आमची जनसेवेची परंपरा अधिक जोमाने पुढे नेली जाईल. शहरातील माता-भगिनी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, युवक, व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील. शहराच्या विकासाबरोबरच पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, शिक्षण, महिला सक्षमीकरण, रोजगारनिर्मिती आणि व्यापारी वर्गाच्या प्रश्नांवर आमचा विशेष भर असेल.”

“या जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते. काळ बदलतो, वेळ बदलते आणि परिस्थितीही बदलत असते. मात्र जनतेच्या सेवेचे आमचे व्रत कधीच बदलणार नाही. आमची वाटचाल केवळ सत्तेसाठी नसून समाजसेवा, जनकल्याण आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी आहे. सर्वसामान्य जनतेप्रती असलेली आमची निष्ठा, विश्वास आणि जनसेवेची बांधिलकी कधीही बदलणार नाही. जनतेचा विश्वास हीच आमची खरी ताकद आहे आणि जनसेवा हाच आमचा श्वास आहे.”, — सौ. रोहिणी सचिन घुले (माजी नगराध्यक्ष, कर्जत)

गेल्या तीन दशकांपासून कर्जतच्या नागरिकांनी दिलेल्या अफाट प्रेम, विश्वास आणि सहकार्याबद्दल त्यांनी अत्यंत कृतज्ञतापूर्वक आभार व्यक्त केले. तसेच, भविष्यात अधिक लोकाभिमुख आणि विकासाभिमुख उपक्रम राबवून शहराच्या प्रगतीत योगदान देण्याचा संकल्प त्यांनी यावेळी बोलून दाखवला. त्यांच्या या भूमिकेमुळे कर्जत शहरात आगामी काळातील त्यांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker