google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्याहस्ते स्वागत

Samrudhakarjat
4 8 7 4 1 3

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये प्रथम वर्षाच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या नवप्रवेशित विद्यार्थी-विद्यार्थिनींचे उत्साहपूर्ण आणि आगळ्या-वेगळ्या पद्धतीने महाविद्यालयात स्वागत करण्यात आले. महाविद्यालय परिसरात स्वागत फलक, फुलांची सजावट आणि आनंददायी वातावरणाने सजला होता. विद्यार्थ्यांमध्ये नव्या शैक्षणिक प्रवासाबाबत उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण पहायला मिळाले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी नवप्रवेशित विद्यार्थी-विद्यार्थिनींना शुभेच्छा देताना सांगितले की, महाविद्यालयीन जीवन हे व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे पर्व आहे. विद्यार्थ्यांनी नियमित अध्ययनासोबतच संशोधन, कौशल्य विकास, क्रीडा, कला आदि उपक्रमामध्ये सहभागी व्हावे आणि सामाजिक बांधिलकी जपत सर्वांगीण प्रगती साधावी असे आवाहन केले. दादा पाटील महाविद्यालय हे गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांसाठी ओळखले जाते. येथे उपलब्ध असलेल्या सर्व शैक्षणिक सुविधा आणि संधींचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार, शिस्त, वेळेचे नियोजन आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडविण्याचा संदेश दिला. तसेच पालकांनी महाविद्यालयावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय सदैव कटिबद्ध असल्याचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी सांगितले.

महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषदेकडून अ प्लस प्लस दर्जा प्राप्त असून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा हे महाविद्यालय जपत आहे. याप्रसंगी महाविद्यालयातील उपप्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक व बहुसंख्य नव प्रवेशित विद्यार्थी उपस्थित होते…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker