राशीन ग्रामपंचायत च्या वतीने निनावी बेकायदेशीर नोटीसद्वारे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न.


(राशीन प्रतिनिधी जावेद काझी.) :- भूमी अभिलेख विभाग आणि राशिन ग्रामपंचायत प्रशासनाच्या कथित मनमानी आणि नियोजनशून्य कारभारामुळे सध्या राशिनच्या स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संभ्रमाचे
आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. गट क्रमांक १४७६ आणि १४७७ च्या हद्द कायम मोजणीवरून हा संपूर्ण वाद उफाळून आला आहे.
मुख्य आक्षेप आणि घोळ: काय आहे नेमके प्रकरण?
तुरळक लोकांना
दिलेल्या तात्काळ आज दिलेल्या नोटीसा नुसार, उप अधीक्षक भूमी अभिलेख (कर्जत) यांच्याकडून जावक क्रमांक ६९० अन्वये २२ जून २०२६ रोजी एक नोटीस परिपत्रक राशिन ग्रामपंचायत कार्यालयाला प्राप्त झाले होते. यानुसार गुरुवार, दिनांक २ जुलै २०२६ रोजी संबंधित गटांची मोजणी नियोजित आहे. मात्र, प्रशासनाने यात पुढील गंभीर चुका केल्याचा आरोप होत आहे:

ऐनवेळी आणि निनावी नोटिसा: कोणत्याही सरकारी नियमानुसार मोजणीची नोटीस संबंधित खातेदारांना ठरावीक दिवस आधी मिळणे बंधनकारक असते. परंतु, मोजणीच्या अवघ्या एक दिवस आधी म्हणजेच बुधवार, १ जुलै २०२६ रोजी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत नागरिकांना नोटिसा देण्यात आल्या. धक्कादायक बाब म्हणजे या नोटिसांवर कोणाचेही नाव न टाकता त्या निनावी पद्धतीने वाटण्यात आल्या, ज्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम वाढला.
आश्वासनाचा भंग: यापूर्वी १९ जून २०२६ रोजी झालेल्या मोजणीच्या वेळी भूमी अभिलेख विभागाने आश्वासन दिले होते की, २ जुलैच्या मोजणीपूर्वी १४७६ व १४७७ या गटांतील सर्व रहिवाशांना रीतसर लेखी नोटीस देऊन प्रक्रियेत समाविष्ट केले जाईल. मात्र, ग्रामपंचायतीने स्वतःहून कोणतीही स्पष्ट नोटीस काढली नाही.

दिशाभूल करण्याचा प्रयत्न: भूमी अभिलेख कार्यालयाच्या मूळ नोटिसीचा आधार घेऊन ग्रामविकास अधिकारी आणि पंचायत समितीच्या बीडीओ (BDO) साहेबांनी जाणीवपूर्वक जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.
नियमांचे उल्लंघन आणि प्रशासकीय मनमानी
वास्तविक पाहता, नियमांनुसार मोजणी करताना:
१. सर्वप्रथम पूर्ण सर्वे नंबर मोजणे आवश्यक असते.
२. त्यानंतर त्या सर्वे नंबरमधील सर्व संबंधित लोकांना कायदेशीर कालावधी राखून नोटीस देणे गरजेचे असते.
३. शेवटी गटातील अंतर्गत रहिवाशांना नोटीस दिली जाते.
या कायदेशीर प्रक्रियेला बगल देऊन, प्रशासनाचा गैरवापर करत मोजणीचा केवळ ‘घाट’ घातला जात असल्याने अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभाराविरुद्ध राशिनकरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सर्वांचे लक्ष उद्याच्या घडामोडींकडे
महत्त्वाचा प्रश्न: नियमांना हरताळ फासून घिसाडघाईने होऊ घातलेल्या या २ जुलै २०२६ च्या मोजणीच्या वेळी प्रत्यक्ष भूमीवर काय घडणार?
उद्या होणाऱ्या या मोजणीच्या वेळी भूमी अभिलेखचे अधिकारी आणि संतप्त ग्रामस्थ यांच्यात समेट होणार, प्रशासनाला माघार घ्यावी लागणार की वाद आणखी चिघळणार, याकडे आता संपूर्ण राशिनकरांचे डोळे लागले आहेत.




