हशु आडवाणी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र नष्टे यांना प्रतिष्ठेचा ‘सह्याद्री रत्न’ आदर्श प्राचार्य पुरस्कार


प्रतिनिधी / राशीन (जावेद काझी):
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेले हशु आडवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे कर्तव्यदक्ष प्राचार्य श्री. राजेंद्र नारायण नष्टे यांना प्रतिष्ठेचा ‘सह्याद्री रत्न’ आदर्श प्राचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुणे येथील पत्रकार भवनात आयोजित विशेष सोहळ्यात प्रसिद्ध सिने-अभिनेते सुनील गोडबोले यांच्या हस्ते प्राचार्य नष्टे यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष नितीन धवणे पाटील आणि संस्थापक अध्यक्ष डॉ. दीपक जाधव यांच्या पुढाकाराने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वाढ, शिस्त, संस्कार, सामाजिक जाणीव आणि विद्यार्थीहित केंद्रस्थानी ठेवून केलेल्या भरीव कामगिरीची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

राशीन ग्रामस्थ व वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने नागरी सत्कार
पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य राजेंद्र नष्टे यांचा हशु आडवाणी विद्यालय व वीरशैव लिंगायत समाज राशीन तसेच ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ व फेटा बांधून विशेष नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी प्रवीण आंधळकर, राजू देवगावकर, दिलीप नष्टे, संजू देवगावकर, रतीकांत देवगावकर, अवि देवगावकर, अनिल देवगावकर, अनिल दडगळ, सुनील दाडगळ, सुनील रामलिंग दडगळ, सुनील जगन्नाथ देवगावकर, सतीश दडगळ, समर्थ आंधळकर मनोज अच्छा, मनोज बोरा, यांसह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्राचार्य राजेंद्र नष्टे : एक परिचय व प्रेरणादायी वाटचाल
पू्र्ण नाव: प्राचार्य श्री. राजेंद्र नारायण नष्टे (M.Sc., B.Ed. – Physics)
शाळा: समाज विकास संचलित, हशु आडवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक (कला, वाणिज्य, विज्ञान) विद्यालय, राशीन, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर.

जन्मदिनांक व ठिकाण: १० जुलै १९७० (मु. पो. राशीन)
कुटुंब: पत्नी – सौ. सीमा नष्टे, मुलगा – विराज नष्टे.
प्रेरणास्थान: आई स्व. ताराबाई व वडील स्व. नारायण नष्टे (जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते, १९८२).
शैक्षणिक प्रवास:
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण: जि. प. प्राथमिक शाळा राशीन व श्री जगदंबा विद्यालय, राशीन.
उच्च शिक्षण: महात्मा गांधी विद्यालय (कर्जत), दादा पाटील महाविद्यालय (बी.एस्सी.), न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर (एम.एस्सी.), आणि श्री बाळासाहेब खराडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, कोल्हापूर (बी.एड.).
२३ वर्षांचा प्रदीर्घ अनुदानाचा संघर्ष व शैक्षणिक कार्य
१३ जून १९९९ रोजी हशु आडवाणी विद्यालयाची स्थापना झाली, तेव्हापासून प्राचार्य नष्टे हे मुख्याध्यापक पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. विद्यालयात २००८ मध्ये ज्युनिअर कॉलेज (कला, वाणिज्य, विज्ञान) सुरू करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
२३ वर्षांचे विनावेतन योगदान:
शाळा अनुदानासाठी त्यांनी विनाअनुदानित शिक्षक संघटनेचे जिल्हास्तरावर नेतृत्व केले आणि प्रदीर्घ १५ वर्षे राज्यस्तरीय आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. सलग २३ वर्षे विनावेतन काम करून शेवटी विद्यालयाला अनुदान मिळवून दिले व स्वतःसह सहकारी शिक्षकांना हक्काचा पगार मिळवून दिला.
विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम
शैक्षणिक विकास: दहावी-बारावीच्या उत्कृष्ट निकालांची परंपरा, करिअर मार्गदर्शन, मुलींसाठी सेल्फ-डिफेन्स (कराटे) शिबिर, आणि वक्तृत्व व क्रीडा स्पर्धांचे आयोजन.
सामाजिक योगदान: ‘मॉर्निंग वॉक टीम’च्या माध्यमातून कोविड काळात १५० ऑक्सिजन सिलेंडरची मदत पुरवली.
इतर क्षेत्रांतील यश: LIC इंडियाचे उत्कृष्ट सल्लागार म्हणून काम करताना अतिशय मानाचे MDRT पद मिळवून १० वेळा ‘करोडपती’ होण्याचा बहुमान पटकावला.
कौटुंबिक व वैयक्तिक संकटांवर मात करत, सर्व सहकारी शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांशी आपुलकीचे नाते जपत प्राचार्य नष्टे यांनी उभे केलेले हे कार्य संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.



