श्री.जगदंबा विद्यालयाचे सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत दैदीप्यमान यश


राशीन प्रतिनिधी जावेद काझी. राशीन : शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 7 वी शिष्यवृत्ती परीक्षेत रयत शिक्षण संस्थेचे श्री. जगदंबा विद्यालय, राशीन च्या विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील पार्थ विक्रम काळे या विद्यार्थ्याने 276 गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत 10 वा क्रमांक मिळवला, तर 3 विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.राजवीर प्रवीण शहाणे याने 262 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत 13 वा क्रमांक,राजवर्धन मकरंद गडदे याने 250 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत 55 वा क्रमांक तर अन्वी ज्ञानेश्वर भागवत हिने 240 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत 150 वा क्रमांक मिळवला…

शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे विद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण प्रगतीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, सराव परीक्षा, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यांच्या जोरावर हे यश संपादन केले.
राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळविणे ही अत्यंत अभिमानाची बाब असून, जिल्हा गुणवत्ता यादीतील तीन विद्यार्थ्यांची कामगिरीदेखील विशेष कौतुकास्पद आहे.या यशामुळे विद्यालयातील इतर विद्यार्थ्यांनाही स्पर्धात्मक परीक्षांसाठी प्रेरणा मिळणार आहे.
या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी रयतचे जनरल बॉडी सदस्य तथा उत्तर विभागीय अध्यक्ष मा.श्री.रोहित दादा पवार,विभागीय अधिकारी श्री.नवनाथ बोडखे,सहाय्यक विभागीय अधिकारी श्री.बाबासाहेब नाईकवाडी,श्री.प्रमोद तोरणे,गुणवत्ता कक्ष प्रमुख श्री.काकासाहेब वाळुंजकर स्थानिक स्कूल कमिटी सदस्य श्री. शाहूराजे राजेभोसले,श्री. रामकिसन साळवे,श्री.ज्ञानेश्वर सायकर,विद्यालयाचे प्राचार्य श्री.प्रकाश उढाणे, उपप्राचार्य श्री. संग्राम राक्षे, पर्यवेक्षक श्री. शिवाजी बाबर, श्री.किशोर कर्पे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, मार्गदर्शक शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या विद्यार्थ्यांना सारिका खराडे,आरती गांगर्डे,परशुराम गांगर्डे, भगवान शिंदे, भाऊसाहेब पवार, सपना साठे, दिपाली गुंडगे, ज्योती काळे, पूजा काळे,सोनाली बर्डे या विषय शिक्षकांनी मार्गदर्शन केले. विद्यालयाच्या या उज्ज्वल यशाबद्दल गुणवंत विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व संपूर्ण विद्यालयाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.




