google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

श्री जगदंबा विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर: वाहतूक कोंडीमुळे अपघाताची भीती.

Samrudhakarjat
4 9 4 7 1 0

राशीन (प्रतिनिधी – जावेद काझी): राशीन (ता. कर्जत) येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री जगदंबा विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. हे विद्यालय बारामती-अमरापूर राज्यमार्गावर असल्याने येथे नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. शाळा भरताना आणि सुटताना वाहनांची वर्दळ, पालकांच्या गाड्या आणि विद्यार्थ्यांची गर्दी यामुळे दररोज मोठी वाहतूक कोंडी होत आहे.

शाळेच्या कंपाऊंडला लागून असलेल्या दुकानदारांनी गटारी व फुटपाथवर शेड मारून सामान ठेवले आहे. काही व्यावसायिक दुकान सोडून रस्त्यावरच काम करत असल्याने विद्यार्थ्यांना रस्त्यावरूनच चालावे लागते. कारणांमुळे मोठी गर्दी होत असते त्यामुळे यादरम्यान अपघात होण्याची दाट शक्यता असते…

 यामध्ये अधिक भर म्हणजे शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेत विनाकारण मोकाट हॉर्न वाजवत फिरणाऱ्या रोड रोमिओ दुचाकीस्वारांमुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होत आहे. या सर्व महत्त्वकांक्षी निर्णय घेण्यासाठी व प्रश्न सोडवण्यासाठी

 शाळा व्यवस्थापन समितीने पोलीस प्रशासनाच्या मदतीने रस्त्यावर अडचण निर्माण करणाऱ्या दुकानदारांना समज द्यावी, तसेच विद्यालयाच्या परिसरात मोकाट फिरणाऱ्या रोड रोमिओंचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी पालक व ग्रामस्थांकडून केली जात आहे…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker