आरास,देखावे, अन् पावसाच्या जलधारात रंगला.. बाळासाहेब देशमुख यांचा ‘मानवतेचा धर्म’.. कथाकथन प्रयोग


राशीन प्रतिनिधी जावेद काझी. :- अहिल्यानगर :- संचारनगर गणेशोत्सव मंडळ ,लेखानगर सावेडी यांनी, कथा लेखक श्री बाळासाहेब देशमुख यांना कथाकथन साठी निमंत्रित केले. मंडळाचे पदाधिकारी राजेश थोरात यांनी सर्वांचे स्वागत केले. पदाधिकारी विक्रांत कंगे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. बाळासाहेब देशमुख यांनी ‘प्रियाचे बाप्पाला मागणे…’ हा कथाकथन प्रयोग सादर केला. त्यात त्यांनी हजार पंधराशे लोकवस्ती असलेल्या ग्रामीण भागातील मानवतेचा धर्म सांगणाऱ्या, माणुसकीचा वसा पेरणाऱ्या , सखुबाईची कथा सादर केली.
आपल्या भव्य वाड्यातील एक रूम, गावात बदली होऊन येणाऱ्या शिक्षकांसाठी , ती मोफत राहावयास देते. गोरगरिबांच्या लेकुरवाळींसाठी तूप आणि शेपाचा लाडू देणारी सखुबाई , विद्यार्थ्यांना ताक दही वाटणारी सखुबाई, गावातील सासरी जाणाऱ्या मुलींना.. उतू नका,मातू नका. संसार अर्ध्यावर सोडू नका. दुसरे आई-वडील असणाऱ्या ,सासू सासर्यांची सेवा करा.’ हा गुरुमंत्र देणारी सखुबाई, अशी नाना रूपे बाळासाहेब देशमुख यांनी, आपली देह बोली,आवाज, संवादाचे चढ उतार ,अभिनयातून हुबेहूब सादर केली. आरास ,देखावे, आणि पावसाच्या जलधारात , हा अनोखा कथाकथन प्रयोग रंगत गेला. मंत्रमुग्ध करून गेला.

याप्रसंगी हनुमंत गोपाळघरे, अनिल क्षीरसागर , विश्वनाथ वाघ, पालवे सर , अमित इंगळे ,निलेश बहिर ,तांदळे साहेब यांच्या शुभहस्ते कथालेखक बाळासाहेब देशमुख यांचा सन्मान करण्यात आला. नाना ढाकणे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व्यक्त केले.




