google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निष्ठावंत शिवसैनिक सुभाष जाधव यांची गरुड झेप; कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुखपदी निवड

Samrudhakarjat
5 0 3 3 8 6

राशीन (प्रतिनिधी : जावेद काझी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक सुभाष जाधव (राशीन) यांची कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून, त्यात जाधव यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सामान्य शिवसैनिक ते विधानसभा प्रमुख असा सुभाष जाधव यांचा राजकीय प्रवास अत्यंत प्रेरणादायी राहिला आहे. पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जाधव यांनी यापूर्वी शाखाप्रमुख, उपशहर प्रमुख, शहर प्रमुख, विभाग प्रमुख, तालुका समन्वयक तसेच विधानसभा समन्वयक अशा विविध पदांची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. इतर पक्षांची प्रलोभने आणि पदांची अमिषे यांना न बळी पडता त्यांनी पक्षाशी कायम एकनिष्ठ राहणे पसंत केले. त्यांच्या याच निष्ठेचे फलित म्हणून पक्षाने त्यांच्यावर विधानसभा प्रमुखपदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे, असा अभिमान शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे.

सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

सुभाष जाधव यांच्या निवडीबद्दल शिवसेना संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, कर्जत तालुकाप्रमुख बळीराम अण्णा यादव, जामखेड तालुकाप्रमुख ॲड. मयूर डोके पाटील, विलास रेणुकर, उपतालुकाप्रमुख अजित कानगुडे, राशीन शिवसेना शहरप्रमुख जितेंद्र शेटे, उपशहर प्रमुख संदीप राऊत, अमृत जंजिरे, साहिल शेख, ऋषिकेश परदेशी, अमोल दळवी, सागर पगी, बाळासाहेब शेटे, सुनील काका दडगळ यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक व मित्र परिवाराने त्यांचे विशेष अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker