राशीन येथील हशू आडवाणी विद्यालयातील पाच कुस्तीपटूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड


राशीन (प्रतिनिधी : जावेद काझी) : – समाज विकास संस्था संचलित येथील हशू आडवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील पाच गुणवान कुस्तीपटूंची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंच्या चमकदार यशामुळे राशीन परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले विद्यार्थी आणि त्यांचे वयोगट खालीलप्रमाणे आहेत: कार्तिक भाऊसाहेब मोहिते (१७ वर्षे वयोगट) हर्षद रामदास काळे (१७ वर्षे वयोगट) राम ज्ञानदेव मोहिते (१९ वर्षे वयोगट) ऋतुराज शरद जानभरे (१९ वर्षे वयोगट) संग्रामराजे सुरेश मोढळे (१९ वर्षे वयोगट)

मेहनत, जिद्द आणि शिस्तीच्या जोरावर या विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले असून, त्यांच्या या कामगिरीमुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या सर्व यशस्वी मल्लांचे विद्यालयाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून जिल्हास्तरीय स्पर्धेतील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत…

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. अल्लाउद्दीन एस. काजी, प्राचार्य श्री. राजेंद्र नारायण नष्टे, ज्युनियर विभाग प्रमुख विठ्ठल काळे सर, क्रीडा शिक्षक आजिनाथ शिंदे सर, संकेत आजबे सर, शेलार सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व कुस्तीपटूंचे विशेष कौतुक केले आहे.



